Bihar Election Result 2025 Saam tv
देश विदेश

Bihar Election Result: सुरुवातीचे कल एनडीएच्या बाजूने, बहुमताचा जादुई आकडा ओलांडला, कुणाला किती जागांवर आघाडी?

Bihar Vidhan Sabha Election Result 2025: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली असून काही तासांच निकल जाहीर होईल. मतमोजणीचा पहिला कल समोर आला असून एनडीए आघाडीवर आहे.

Priya More

Summary -

  • बिहार विधानसभा निवडणुकीचा निकला आज जाहीर होणार

  • सुरूवातीच्या कलानुसार एनडीए १३२ जागांवर आघाडीवर

  • अनेक महत्त्वाच्या जागांवर एनडीएने मिळवली आघाडी.

  • आरजेडी – काँग्रेसची काही ठिकाणी आघाडी

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. मतमोजणी सुरू असून सुरूवातीचा कल समोर आला आहे. सुरूवातीच्या कलानुसार एनडीए आघाडीवर आहे. एनडीएने बहुमताचा आकडा ओलांडला आहे. एनडीएला १३२ जागांवर, महाआघाडी ७२ जागांवर आणि इतर ५ जागांवर आघाडीवर आहेत. आतापर्यंच्या कलानुसार भाजप बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महायुती आणि महाआघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. सर्व मतदान केंद्राबाहेर मोठी गर्दी झाली आहे.

सुरूवातीच्या कलानुसार एनडीएला बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे. मतमोजणी जसजशी पुढे जात आहे. तसतसे एनडीए आपली आघाडी कायम ठेवत आहे. एनडीएने बहुमताचा आकडा ओलांडला आहे. एनडीए १३२ जागांवर आघाडीवर आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजप राजनगर, औरई, बरुराज, साहेबगंज आणि कुम्हारार या जागांवर आघाडीवर आहे. विरोधी पक्ष आरजेडीने बनियापूर आणि दानापूरमध्ये आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस बिक्रममध्ये आघाडीवर आहे.

बिहारमध्ये कुणाची सत्ता येणार हे आज निश्चित होणार आहे. एनडीए आणि महाआघाडीमध्ये जोरदार टक्कर सुरू आहेत. तर नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यात चुरशीची लढत होताना पाहायला मिळत आहे. यापैकी कोण विजयी होईल हे येत्या काही तासांच स्पष्ट होईल. २४३ मतदारसंघांमध्ये बहुमतासाठी १२२ जागांवर विजयी होणं गरजेचे आहे.

बिहारमध्ये २४३ मजागांसाठी दोन टप्प्यामध्ये मतदान झाले होते. आज मतमोजणी सुरू असून ४६ मतदान केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे. नितीश कुमार यांनी विजय आपलाच होईल अशी घोषणा केली. तर तेजस्वी यादव यांनीही १८ नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ आपणच घेणार असा दावा त्यांनी केला. बिहारमध्ये नितीश कुमार सत्ता टिकवून ठेवतील की तेजस्वी यादव बिहारची सत्ता मिळवण्यात यशस्वी होतील याचे चित्र आज स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कॅन्सर झाला म्हणून कर्मचाऱ्याला कामावरुन काढलं

Vatana Bhaji Recipe: वटाण्याची झणझणीत रस्सा भाजी कशी बनवायची?

Hingoli Earthquake : हिंगोली भूकंपाने हादरलं, १० गावांतील नागरिकांची भीतीने पळापळ

Neelam Kothari: प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विमानात घडला विचित्र प्रकार; सोशल मीडियावर पोस्ट करत केला धक्कादायक खुलासा

Benefits Of Amla In Pregnany: गरोदर महिलेने आवळा खावा की नाही?

SCROLL FOR NEXT