Bihar Elections Result 2025 saam tv
देश विदेश

Bihar Election Result: सत्तेच्या चाव्या ६ मतदारसंघात, या ठिकाणी जिंकणाऱ्यांचेच सरकार, पाहा १९७७ पासूनचा ट्रेंड काय सांगतो...

Bihar Assembly Elections Result 2025: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होईल. बिहारमध्ये २४३ मजागांसाठी दोन टप्प्यामध्ये मतदान झाले होते. आज निकाल स्पष्ट होईल. हा निकाल लागण्यापूर्वी बिहारमधील ६ मतदारसंघाची जोरदार चर्चा होत आहे. नेमकं कारण काय?

Priya More

Summary:

  • बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे

  • बिहारमध्ये २४३ मजागांसाठी दोन टप्प्यामध्ये मतदान झाले होते

  • ४६ मतमोजणी केंद्रावर मतमोजणी सुरू आहे

  • बिहारमधील ६ मतदारसंघाची चर्चा होत आहे. याठिकाणी विजयी होणाऱ्या पक्षाचे सरकार येते

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली. बिहारमध्ये कुणाची सत्ता येणार याचे चित्र आज स्पष्ट होईल. अशातच बिहारमध्ये सध्या त्या ६ मतदारसंघाची जोरदार चर्चा होत आहे. या ६ मतदारसंघांनी गेल्या अनेक वर्षांपासून ट्रेंड सेट केला आहे. या सहा मतदारसंघांवर जो पक्ष किंवा युती जिंकते त्यांचेच सरकार बिहारमध्ये स्थापन झाले आहे. १९७७ च्या बिहार विधानसभा निवडणुकीपासून या ६ मतदारसंघाला बिहारच्या राजकारणात खूप महत्व आहे.

बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये यंदा कोण विजयी होऊन सरकार स्थापन करेल हे काही तासांच स्पष्ट होईल. पण १९७७ पासून सुरू असलेला ट्रेंड यंदापण खरा ठरेल की नाही हे पाहणं महत्वाचे राहिल. केवटी, सकरा, सहरसा, मुंगेर, बरबीघा आणि पिपरा या विधानसभा मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या मतदारसंघांनी १९७७ पासून ट्रेंड सेट केला असून या ठिकाणी जो पक्ष जिंकतो तोच पक्ष बिहारमध्ये सरकार स्थापन करतो. बिहारमध्ये यंदा विधानसभेचे २४३ मतदारसंघ आहेत.

केवटी विधानसभा मतदारसंघ -

दरभंगा जिल्ह्यातील केवटी विधानसभा मतदारसंघाचा ट्रेंड रेकॉर्ड १०० टक्के सरकार बनवणारा ठरला आहे. २०२० मध्ये या मतदारसंघात भाजपचा विजय झाला होता. भाजप नेतेचे मुरारी मोहन झा यांनी आरजेडीच्या फर्ज फातमी यांचा पराभव केला होता. जदयूच्या नेतृत्वाखाली नितीश कुमार यांचे सरकार स्थापन झाले होते.

सहरसा विधानसभा मतदारसंघ -

मिथिलांचलच्या पूर्वेकडील भागात असलेला सहरसा विधानसभा मतदारसंघ हा एक असा एक मतदारसंघ आहे याठिकाणी विजयी होणारा आमदार सत्ताधारी पक्षाचा सदस्य बनण्याचा ट्रेंड आहे. २०२० मध्ये भाजपचे आलोक रंजन झा येथून विजयी झाले होते. यावेळी ते पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि आयआयपीने महाआघाडीकडून इंद्रजित गुप्ता यांना उमेदवारी दिली आहे.

सकरा विधानसभा मतदारसंघ -

अशाच पद्धतीने मुजफ्फरपूरच्या सकरा विधानसभा मतदारसंघाचे नाव देखील सरकार बनवण्याच्या ट्रेंडमध्ये घेतले जाते. या मतदारसंघाचा ट्रेंड फक्त १९८५ मध्ये बदलला होता. तेव्हा याठिकाणी लोकदलचे शिवनंदन पासवान जिंकलेहोते. पण सरकार काँग्रेसचे स्थापन झाले होते. मागच्या वेळी याठिकाणी जेडीयू पक्षाचा विजय झाला होता.

मुंगेर विधानसभा मतदारसंघ -

मुंगेर विधानसभा मतदारारसंघाचे नाव देखील या ट्रेंडमध्ये घेतले जाते. या मतदारसंघाचा फक्त एकदाच म्हणजे १९८५ मध्ये वेगळा निकाल आला होता. तेव्हा याठिकाणी लोकदल पक्षाचा विजय झाला होता. पण त्यांचे सरकार होऊ शकले नाही. २०२० मध्ये याठिकाणी भाजपचे प्रणय कुमार यादव यांचा विजय झाला होता.

पिपरा विधानसभा मतदारसंघ -

पूर्व चंपारणच्या पिपरा विधानसभा मतदारसंघामध्ये साधारणत: सत्ताधारी पक्षाचा विजय झाला होता. पण २०१५ मध्ये याठिकाणी भाजपचे श्यामबापू प्रसाद यादव यांचा विजय झाला होता. पण सरकार महाआघाडीची बनली होती. पण नंतर नितीश कुमार भाजपसोबत आले आणि सरकार त्यांचे स्थापन केले होते. यावेळी देखील नितीश कुमार हे बिहारचे विद्यमान आमदार आहेत आणि ते सीपीएमच्या राजमंगल प्रसाद यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत.

बारबीघा विधानसभा मतदारसंघ -

बारबीघा विधानसभा मतदारसंघातही सरकार स्थापनेचा असाच ट्रेंड पाहायला मिळाला. जनता पक्षाने १९७७ मध्ये ही जागा जिंकली आणि त्यानंतर २००० पर्यंत काँग्रेस जिंकत राहिली. २०२० मध्ये ही जागा जेडीयूकडे गेली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : बिहारमध्ये एनडीएचे द्विशतक, विरोधक ४० आताच

Best Oil For Heart: हिवाळ्यात हृदयरोगाचा धोका वाढतो? नसा ब्लॉक होण्याची भीती? आहारात कोणते तेल वापरावे? FSSAIने दिली माहिती

Bihar : जलवा है हमारा यहाँ! बिहारमध्ये चिराग पासवान चमकले? निवडणुकीत नेमकं काय घडलं?

RJD नाही, JDU नाही....बिहारमध्ये भाजपच सर्वात मोठा पक्ष, आता मुख्यमंत्री कोण होणार?

Hirvi Mirchi Loncha: हिरव्या मिरचीचा झणझणीत लोणचा अवघ्या १० मिनिटांत बनवा, ही आहे सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT