Bihar Crime News saam tv
देश विदेश

Bihar Crime News: रक्ताच्या थारोळ्यात सापडला हात, ट्रेनमध्ये पळापळ; कोटा-पाटणा एक्स्प्रेसमधील थरारक घटना

Bihar Crime News: प्रवाशांनी या घटनेची तात्काळ माहिती रेल्वे पोलिसांना दिली.

साम टिव्ही ब्युरो

Bihar Crime News:

बिहारच्या बक्सरमधील पटना कोटा एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात गुरूवारी (28 सप्टेंबर ) सध्यांकाळी 5.30 च्या सुमारास ट्रेनमध्ये एक खळबळ जनक घटना घडली आहे. एका व्यक्तीचा कापलेल्या हाताचा पंजा आढळला आहे. (Latest Marathi News)

एबीपीन्यूजच्या वृत्तानुसार, हारच्या बक्सरमधील पटना कोटा एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात गुरूवारी सध्यांकाळी साडेपाचच्या सुमारास ट्रेनमध्ये कापलेला हाताचा पंजा आढळला होता. हाताचा पंजा आढळल्याने प्रवासी घाबरले. बक्सरला ट्रेन आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. ही ट्रेन कोटाहून पाटण्याकडे येत होती. प्रवाशांनी या घटनेची तात्काळ माहिती रेल्वे पोलिसांना दिली.

रेल्वे पोलिसांना हा प्रकार समजतात त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात रक्ताचे डाग पसरल्याचे दिसले आणि खिडक्यांच्या काचा फुटलेल्या दिसल्या. या घटनेमुळे ट्रेन ६:१९ पर्यंत थांबली परंतू प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन ट्रेन पुढे पाठवण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुलसी आश्रम ते भदौरा स्थानकादरम्यान चालत्या ट्रेनमध्ये दोन गटांमध्ये हाणामारी झाली. त्याचवेळी मारामारीत रेल्वेची काचही तुटल्या गेल्या. या हल्लेखोरांना पाहून प्रवासी घाबरून इकडे तिकडे लपले. त्याच दरम्यान एका व्यक्तीला चालत्या ट्रेनमधून फेकल्यानंतर सर्व हल्लेखोर फरार झाले किंवा या व्यक्तीने आपला जीव वाचवण्यासाठी ट्रेनमधून उडी मारली असावी, असा अंदाज आहे. यानंतर प्रवाशांना हाताचा तोडलेला पंजा दिसला, त्यानंतर दानापूर कंट्रोलला याची माहिती देण्यात आली.

जीआरपी पोलिस स्टेशनचे प्रमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर ट्रेनमधून खाली पडलेल्या तरूणाचा शोध सुरू केला. पोलिस तपास सुरू असताना पोलिसांना गहमर येथे एक व्यक्ती ट्रेनमधून पडून असल्याची माहिती मिळाली. त्यानतंर त्या जखमी तरुणाची ओळख पटली असून ट्रेनमधून खाली पडलेला आणि गहमर येथील तरुण एकच आहे असे समजले.

ट्रेनमधून खाली पडलेल्या तरूणाचे नाव अर्जुन कुमार असे आहे. तो हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील सामलका येथील रहिवासी आहे. गुरूवारी जेव्हा अर्जुन ट्रेनमधून खाली पडला. त्यानतंर त्याला जखमी अवस्थेत पाहून काही लोकांनी भदौरा (यूपी) येथे प्राथमिक उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले . पुढील उपचारासाठी गाझीपूर सदर रुग्णालयात दाखल केले.

ही घटना कशी घडली याबाबत अधिक तपास रेल्वे पोलीस करत आहेत. या घटनेबद्दल पीडित तरूणाशी संवाद साधून या घटनेतील आरोपींवर योग्य ती कारवाई करू असे रेल्वे पोलिसांनी माध्यंमाशी बोलताना सांगितले .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर

IND vs ENG 2nd Test Score Live: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

SCROLL FOR NEXT