Horrific Crime news Saam Tv News
देश विदेश

परीक्षा देऊन घराकडं निघाली, वाटेत तिघांनी अडवलं; झुडपात नेत सामूहिक बलात्कार, पीडितेची प्रकृती नाजूक

Horrific Crime news: परीक्षा देऊन अल्पवयीन मुलगी घराकडे ऑटोतून जात होती. मात्र, तीन नराधमांनी तिची वाट अडवली. तसेच तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

Bhagyashree Kamble

बिहारमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच आणखी एका घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शाळेतून परतणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. तीन नराधमांनी मिळून हे कृत्य केलं आहे. तिचे आधी अपहरण केले. नंतर तिच्यावर बलात्कार केला. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक आणि कुटुंबियांनी गंभीर अवस्थेत असलेल्या विद्यार्थिनीला बेलसंड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. या घटनेनंतर परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

सीतामढ जिल्ह्यातील बेलसंड पोलीस स्टेशन परिसरात कोठी बाजाराजवळ दिवसाढवळ्या ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी अल्पवयीन मुलगी परीक्षा देऊन शाळेतून घरी परतत होती. घरी परतत असताना, गुन्हेगारांनी विद्यार्थिनीची ऑटो अडवली. तसेच तिचे ऑटोमधून अपहरण केले. तिला जबरदस्ती अंमली पदार्थ खायला दिले. तसेच तिला अज्ञातस्थळी झुडपात नेऊन अत्याचार केला.

तिघांनी मिळून सामूहिक बलात्कार केला. विद्यार्थिनीची अवस्था पाहून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आणि कुटुबियांनी तिला तातडीने रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या पीडितेची प्रकृती अतिशय नाजूक असल्याची माहिती आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी तपासणीला सुरूवात केली.

स्टेशन हाऊस ऑफिसर सुशील कुमार सिंह यांनी सांगितले की, 'पीडितेच्या कुटुंबियांनी अद्याप तक्रार दाखल केलेला नाही. अर्ज मिळाल्यानंतर एफआयआर दाखल केला जाईल. आरोपींचा शोध सध्या सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जात आहे'. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, आरोपींना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात नोव्हेंबरचे ₹१५०० जमा होण्यास सुरुवात; तुम्हाला आले की नाही? झटपट करा चेक

LPG Price 1 January: नव्या वर्षात मोठा धक्का, एलपीजी सिलिंडर झाला महाग, किती झाली वाढ?

Maharashtra Live News Update : गुडबाय २०२५, वेलकम २०२६: नवीन वर्षाच्या स्वागतात मुंबई-पुणेकर दंग

Rule Change: LPG गॅस सिलिंडरचे दर वाढणार की कमी होणार? १ जानेवारीपासून जाहीर होणार नव्या किमती

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मिळालं नववर्षाचं गिफ्ट; लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात

SCROLL FOR NEXT