देश विदेश

Shocking: पोटच्या गोळ्याचे भयानक कृत्य, दारूच्या नशेत आईची हत्या, बापालाही बेदम मारलं

Bihar Crime News: गावातील अमरेंद्र कुमार यांच्या माहितीप्रमाणे, गुड्डू या नशेत तरुणाने पत्नीवर हल्ला केला. हस्तक्षेप करणाऱ्या वडील इंद्रदीप साहनी व आई मीना देवीलाही त्याने मारहाण करून जखमी केले.

Dhanshri Shintre

नवरात्रीच्या पावन दिवसांत माता दुर्गेची पूजा सुरू असताना बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील रामपुरहरी पोलीस ठाण्याअंतर्गत मदारीपूर कर्ण गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गावातील गुड्डू नावाच्या तरुणाने दारूच्या नशेत स्वतःच्या आईची काठीने वार करून हत्या केली असून त्याने वडिलांनाही गंभीर जखमी केले आहे. घटनेनंतर आरोपी फरार असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

गावातील रहिवासी अमरेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी गुड्डू दारू पिऊन घरी आला होता आणि त्याने आपल्या पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून त्याचे वडील आंद्रदीप साहनी मुलाला समजवण्यासाठी पुढे गेले. मात्र रागाने पेटलेल्या गुड्डूने वडिलांनाही मारहाण करून जखमी केले. त्यानंतर आई मीना देवी (४५) मुलीला वाचवण्यासाठी धावली, पण गुड्डूने संतापाच्या भरात काठीने तिच्या डोक्यावर जोरदार आघात केला. गंभीर जखमांमुळे मीनाचा जागीच मृत्यू झाला.

गुड्डूचे गेल्या वर्षीच लग्न झाले होते आणि त्याला एक लहान मुलगी आहे. पोलिसांच्या तपासानुसार, घरातील वादाचे कारण बहिणीच्या लग्नावरील सततचे मतभेद असल्याचे समोर आले आहे. या कौटुंबिक वादामुळे घरातील वातावरण नेहमीच तणावपूर्ण असत, आणि याच पार्श्वभूमीवर हे थरारक हत्याकांड घडले.

घटनेची माहिती मिळताच, पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मीना देवीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मुझफ्फरपूर येथील एसकेएमसीएच रुग्णालयात पाठवला. आरोपीचा धाकटा भाऊ राजेश कुमार सध्या मुंबईत काम करतो, त्यामुळे तो घटनेच्या वेळी गावात नव्हता.

स्टेशन हाऊस ऑफिसर शिवेंद्र नारायण सिंह यांनी सांगितले की, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला आहे. घटनेबाबत अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही, मात्र अर्ज प्राप्त होताच तातडीने कारवाई सुरू करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान गुड्डू फरार असून पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी विशेष शोधमोहीम हाती घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT