MLA Viral Video Saam Tv
देश विदेश

आमदाराचे २ अश्लील व्हिडीओ व्हायरल, तरुणीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत...; राजकारण तापलं

MLA Suryakant Paswan Video: बिहारमधील एका आमदाराचे तरुणीसोबतचे आक्षेपार्ह स्थितीमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फक्त व्हिडीओच नाही तर फोटो देखील व्हायरल झाले आहेत. त्यामुळे हा आमदार आता अडचणीत आला आहे.

Priya More

बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील बाखरी विधानसभा मतदारसंघातील सीपीआय आमदार सूर्यकांत पासवान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडले आहेत. या आमदाराचा एका तरुणीसोबतचा कथित अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बिहारमधील राजकारण चांगलेच तापले आहे. या आमदाराचे तरुणीसोबतचे आक्षेपार्ह स्थितीमधील दोन वेगवेगळे व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल झाले आहेत.

आमदार सूर्यकांत पासवान यांचे तरुणीसोबतचे आक्षेपार्ह स्थितीमधील फोटो आणि व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हे व्हिडीओ सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही तासांतच आमदार सूर्यकांत पासवान यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. हे संपूर्ण व्हिडीओ कट रचून व्हायरल केल्याचे आमदाराने सांगितले. या प्रकरणी आमदाराने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपींविरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

आमदार सूर्यकांत पासवान यांनी सांगितले की, 'हा व्हिडिओ पूर्णपणे एडिट केलेला आहे. माझी प्रतिमा मलिन करण्याचा हा कट आहे.' त्यांनी पुढे असे देखील सांगितले की, त्यांनी अलीकडेच बखरी डीएसपी आणि दारू माफियांच्या संगनमताबद्दल डीजीपीकडे तक्रार दाखल केली होती. त्यांनी आरोप केला की, 'त्यांनी दारू तस्करीबाबत अनेक अधिकाऱ्यांविरोधात आवाज उठवला होता आणि त्याचा बदला म्हणून त्यांनी माझे हे असे व्हिडिओ व्हायरल केले आहेत.'

त्यांनी पुढे असेही सांगितले की, 'असे व्हिडीओ व्हायरल करून माझ्या प्रतिष्ठेवरच नाही तर सत्यासाठी लढणाऱ्या लोकप्रतिनिधींना धमकावण्याचा प्रयत्न आहे.' या प्रकरणी त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पण बखरी पोलिस प्रशासन आणि डीआयजी रेंजकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashish Damle : परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षाला मंत्रिपदाचा दर्जा; अजित पवार गटाच्या पारड्यात आणखी एक मंत्रिपद

Ashram School : वर्षभरापासून पोल्ट्री फार्ममध्ये भरतेय आश्रम शाळा; १२ कोटीची सुसज्ज शाळेची इमारत पडून

Beed–Ahilyanagar Train: बीड ते अहिल्यानगरच्या रेल्वेचं प्रवास भाडे किती? रेल्वे मार्गावर एकूण स्टेशन किती?

Vitamin D: नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी वाढवण्यासाठी करा 'या' गोष्टी

EVM Machine: मोठी बातमी! ईव्हीएम मशीनमध्ये महत्वाचा बदल, बिहार निवडणुकीपासून होणार सुरूवात

SCROLL FOR NEXT