Bihar Education Officer Raid News Saam Tv
देश विदेश

Education Officer Raid : शिक्षण अधिकाऱ्याकडे सापडलं घबाड; बेडभर पैसेच पैसे, नोटा मोजण्यासाठी मागवल्या मशीन्स

Bihar News : बिहारच्या एका शिक्षण अधिकाऱ्याच्या घरी छापा मारण्यात आला. या छाप्यामध्ये कोट्यावधींची संपत्ती जप्त करण्यात आली. छाप्यात इतक्या नोटा सापडल्या की पैसे मोजण्यासाठी मशीन्स मागवाव्या लागल्या.

Yash Shirke

बिहारमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शिक्षण अधिकाऱ्याच्या घरातून कोट्यावधी रुपयांच्या रोख रकमेसह मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. बिहारमधील दरभंगा, मधुबनी, बेतिया आणि समस्तीपूर यांसह अन्य ठिकाणी बिहार दक्षता दलाकडून छापेमारी करण्यात आली. ही कारवाई एडीजी पंकज कुमार दराद यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, रजनीकांत प्रवीण या शिक्षण अधिकाऱ्याच्या घरावर सकाळी छापा टाकण्यात आला. या दरम्यान घरात कोणालाही प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती. छाप्यामध्ये कोट्यावधींच्या नगदी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. घरात दोन बेड भरुन ५००-२०० रुपयांच्या नोटा सापडल्या होत्या. नोटा मोजण्यासाठी मशिन्स मागण्यात आल्या होत्या. या सर्व मालमत्तेची किंमत अंदाजे १.८७ कोटी रुपये आहे असा अंदाज वर्तवला जात आहे.

शिक्षण अधिकाऱ्याचे घर, कार्यालयासह अन्य जागांवरही छापा मारला गेला आहे. यातून त्याची संपत्ती ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अधिकाऱ्यावर भष्ट्राचार केल्याचा आरोप बिहारमधील शिक्षण संघटनांनी केला होता. त्यावरुनच छापा मारला असल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी शिक्षण अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे.

बिहारमधील हा भष्ट्र शिक्षण अधिकारी बेतिया या ठिकाणी कार्यरत आहे. तो बिहार राज्य शिक्षा विभागाच्या ४५ व्या बॅचचे ऑफिसर आहेत. २००५ पासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्यावर भष्ट्राचार केल्याचा आरोप आहे. त्याची बायको एक शाळा चालवते. भष्ट्राचार करुन मिळवलेले पैसे पत्नीच्या शाळेत लावल्याचा आरोपही शिक्षण अधिकाऱ्यावर केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

Ambajogai News : स्मशानभूमी नसल्याने मृतदेह ठेवला नगरपरिषद कार्यालयाबाहेर; अंबाजोगाईत लिंगायत समाज आक्रमक

Ind vs Eng : पराभवाच्या छायेत असणाऱ्या टीम इंडियाचा खुशखबर! इंग्लंडचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

Maharashtra Live News Update: “सुवर्णकारांसाठी धोरणात्मक पाठबळ सरकार देईल” – विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची ग्वाही

Nag Panchami 2025: नाग पंचमीला किचन मधील या वस्तू वापरू नका, नाहीतर...

SCROLL FOR NEXT