Bihar CM Nitish Kumar helicopter emergency landing Latest Update  SAAM TV
देश विदेश

Nitish Kumar News | बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, त्यावेळी नेमकं काय घडलं?

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. कारण आलं समोर

Nandkumar Joshi

Bihar CM Nitish Kumar helicopter emergency landing Latest Update | पाटणा: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. नितीश कुमार हे शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सर्व्हे करणार होते. राज्यातील पाच जिल्ह्यांतील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी ते निघाले होते. याबाबत एएनआयने ट्विट केले आहे.

बिहारमधील (Bihar) पाच जिल्ह्यांत शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. पीके उद्ध्वस्त झाली आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) हेलिकॉप्टरने जात होते. मात्र, खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

जहानाबाद, अरवल यांसह अन्य जिल्ह्यांमध्ये ते हवाई पाहणी करणार होते. मात्र, खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर तात्काळ उतरवण्यात आले. बिहारमध्ये कमी पर्जन्यमानामुळे अनेक जिल्ह्यांतील पीके उद्ध्वस्त झाली आहेत. त्याचा आढावा घेण्यासाठी नितीश कुमार हवाई पाहणी करणार होते.

नितीश कुमार यांच्या हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग गया जिल्ह्यात करण्यात आली. त्यांच्यासोबत बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव देखील होते, असे सांगण्यात येते. मात्र, त्याबाबत अद्याप खात्रीलायक माहिती मिळू शकलेली नाही.

नितीश कुमार यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्यानंतर गया जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली. जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकारी विमानतळावर पोहोचले. आता मुख्यमंत्री नितीश कुमार हे रस्तेमार्गे पाटणा येथे जाणार असून, वाहनताफ्याची व्यवस्था करण्यात आली.

गयाचे जिल्हाधिकारी डॉ. त्यागराजन यांनी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. खराब हवामानामुळे गया येथे हेलिकॉप्टर उतरवण्यात आले. नितीश कुमार यांच्यासोबत बिहारचे मुख्य सचिव आमिर सुबहानी देखील आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam: गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा कधी घेणार? सावली वरुन परबांनी कदमांना घेरलं

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत तुफान राडा! प्रसिद्ध कृष्णा-जो रूट भिडले, शांत केएल राहुलही भडकला; Video

Devendra Fadnavis: बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही; फडणवीसांचा वादग्रस्त मंत्र्यांना इशारा

Horrific Accident : वाढदिवसाच्या पार्टीवरून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Pune Police : पुण्यात पोलीसच असुरक्षित! बाईक अडवल्याने तरुणांची गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

SCROLL FOR NEXT