मोठी बातमी! दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचा छापा

आम आदमी पक्षाचा आणखी एक नेता सीबीआयच्या रडारवर
Manish Sisodia
Manish SisodiaSaam Tv
Published On

नवी दिल्ली - सीबीआयचे (CBI) पथक दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या घरी पोहोचले आहे.सीबीआयकडून सध्या एकाच वेळी २० ठिकाणी छापमारी करण्यात येत आहे. मनीष सिसोदिया यांनीही ट्विट करून ही माहिती दिली आहे. ट्विट करत मनिष सिसोदिया म्हणले की, सीबीआय आलेली असून त्यांचे स्वागत आहे. आम्ही ईमानदार आहोत. लाखो मुलांच्या भविष्य उभारणीचे काम आम्ही करत आहोत. जो चांगले काम करतो त्याला असाच त्रास दिला जातो. आपल्या देशाचे हे दुर्देव आहे. त्यामुळेच आपला देश अजून नंबर-१ बनलेला नाही.

दुसऱ्या ट्वीटमध्ये सिसोदिया यांनी लिहिलं आहे की,आम्ही सीबीआयचे स्वागत करतो. तपासात पूर्ण सहकार्य करू जेणे करून सत्य लवकर बाहेर येईल. आत्तापर्यंत माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत, मात्र काहीही निष्पन्न झाले नाही. त्यातूनही काहीही निष्पन्न होणार नाही. देशात चांगल्या शिक्षणासाठी माझे काम थांबवता येणार नाही.

आणखी एका ट्विटमध्ये ते म्हणाले, दिल्लीच्या शिक्षण आणि आरोग्याच्या उत्कृष्ट कामामुळे हे लोक त्रस्त आहेत. त्यामुळेच शिक्षण आरोग्याचे चांगले काम बंद पडावे म्हणून दिल्लीचे आरोग्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. आमच्या दोघांवर खोटे आरोप आहेत. न्यायालयात सत्य बाहेर येईल असे देखील ते आपल्या ट्विटमध्ये म्हणले आहे.

सीबीआयची ही कारवाई दिल्ली सरकारच्या अबकारी धोरणाशी संबंधित असल्याचे मानले जात आहे. वास्तविक, अलीकडेच दिल्लीचे नायब राज्यपाल विनय सक्सेना यांनी सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. हा अहवाल ८ जुलै रोजी एलजीला पाठवण्यात आला होता.मुख्य सचिवांच्या अहवालानंतर एलजी व्हीके सक्सेना यांनी हे पाऊल उचलले आहे. या अहवालातील मनीष सिसोदिया यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

नव्या धोरणामुळे दिल्ली उत्पादन शुल्क कायदा आणि दिल्ली उत्पादन शुल्क नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप अहवालात करण्यात आला आहे. याशिवाय, दारू विक्रेत्यांचे परवाना शुल्क माफ केल्यामुळे सरकारचे 144 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com