Bihar CM Nitish Kumar Saam Digital
देश विदेश

Bihar CM Nitish Kumar: महिलांबाबतच्या वक्तव्यानंतर वाद चिघळला... नितीश कुमार यांनी मागितली माफी

Bihar CM Nitish Kumar: राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेत माफी मागण्याची मागणी केली होती. त्यानंतर नितीश कुमार यांनी वादग्रस्त विधानाबाबात विधानसभेत माफी मागितली आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bihar CM Nitish Kumar

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभेत लोकसंख्या नियंत्रणावरून महिलांवर वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानावरून टीकेची झोड उठली होती. राष्ट्रीय महिला आयोगानेही दखल घेत माफी मागण्याची मागणी केली होती. त्यानंतर नितीश कुमार यांनी वादग्रस्त विधानाबाबात विधानसभेत माफी मागितली आहे.

नितीश कुमार यांनी मंगळवारी विधानसभेत आरक्षणाची मर्यादा वाढवण्याबाबत मांडलेल्या प्रस्तावावर चर्चा सुरू होती. यादरम्यान महिलांचा प्रश्न उपस्थित झाला होता. यावेळी नितीश कुमार यांनी महिलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे. महिला सुशिक्षित झाल्या सर लोकसंख्याही नियंत्रित राहील, असे विधान केले होते. त्यानंतर सभागृहात महिला आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. नितीश कुमार यांच्या विधानावर देशभरातून टीका सुरू झाली होती. महिला आयोगाने नितीश कुमार यांची महिलांविषयीची भाषा अतिशय अपमानास्पद आणि घृणास्पद असल्याची टीका करताना माफी मागण्याची मागणी केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान नितीश कुमार यांनी या विधानावरून स्वत:चा बचाव करताना, आपण महिलांच्या शिक्षणावर बोलत होतो. महिलांच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच प्रजनन दर २ टक्क्यांवर आला आहे. यात महिलांच्या सबलिकरणाचाच विषय मांडण्यात आला आहे. यावरून वाद निर्माण होणे दुर्दैवी आहे. जर महिलांच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांची माफी मागतो, मात्र कोणाचा अपमान करण्याचा हेतू आपला नव्हता, असे स्पष्टीकरण नितीश कुमार यांनी दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT