Preparations underway at Gandhi Maidan for Bihar cabinet expansion swearing-in ceremony. saam tv
देश विदेश

Bihar Cabinet Expansion: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? 'सम्राट' सरकारमध्ये किती असणार मंत्री?

Bihar Cabinet Expansion : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागला असून यातील तीन राज्यात भाजपनं सत्ता मिळवली आहे. आता बिहारमधील राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे आता लक्ष लागले आहे.

Bharat Jadhav

  • ७ मे रोजी बिहार मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता

  • गांधी मैदानावर शपथविधी सोहळा होणार

  • ५०-५० फॉर्म्युलानुसार मंत्रिपद वाटप

मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा २०२६ चा मंत्रिमंडळ विस्तार होणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत आहेत. राज्याचा कारभार संभाळल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नितीश कुमार यांची भेट घेतली आहे. या भेटीत राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असल्याचं म्हटलं जात असताना त्यासंदर्भात मोठी अपडेट हाती आली आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याला मुर्हूत मिळाला आहे.

पुढील दोन दिवसात म्हणजेच ७ मे रोजी बिहार राज्य सरकारचा विस्तार होणार आहे. मंत्र्यांचा शपथविधी सोहळा गांधी मैदानावर पार पडणार आहे. त्यासाठी जिल्हा स्तरावर तयारी सुरू झाली आहे. तसेच बिहार सरकारमध्ये मंत्रीपद ५०-५० च्या फॉर्म्युलानुसार दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे बिहारमधील मंत्रिमंडळ विस्ताराला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

भविष्यातील राजकीय घडामोडी आणि निवडणूक रणनीतीसाठीही हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. सूत्रांनुसार मंत्रिमंडळ विस्तारात एनडीएच्या घटक पक्षांमधील जागावाटपाची व्यवस्था जवळपास निश्चित झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे १२, जनता दल युनायटेडचे ​​११, लोक जनशक्ती पक्षाचे २ आणि हिंदुस्तानी आवाम मोर्चा व राष्ट्रीय लोक मोर्चाचे प्रत्येकी एक मंत्री शपथ घेणार असल्याची शक्यता आहे.

बिहार मंत्रिमंडळात ५०-५० चा फॉर्मुला

नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर सम्राट चौधरी यांनी १५ एप्रिल रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर जेडीयूचे दोन ज्येष्ठ नेते, विजय कुमार चौधरी आणि बिजेंद्र प्रसाद यादव यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु सम्राट सरकारमधील उर्वरित ३३ मंत्रिपदे गेल्या १९ दिवसांपासून रिक्त आहेत. आता सरकारमधील नेत्यांना खातेवाटप केलं जाणार आहे. एनडीएच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकारमध्ये भाजप आणि जेडीयूच्या मंत्र्यांची संख्या समान असणार आहे.

अशी असणार मंत्र्यांची संख्या

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचाही समावेश असणार आहे.

भाजपचे १२ मंत्री आणि जेडीयूचे ११ मंत्री असतील.

एलजेपी (आर) चे दोन, तर एचएएम आणि आरएलएसपीचे प्रत्येकी एक मंत्री असतील.

सध्याच्या मंत्रिमंडळात दोन किंवा तीन पदे रिक्तही ठेवली जातील.

नितीश कुमार आणि सम्राट चौधरी यांची भेट

बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असताना, मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी सोमवारी जनता दल युनायटेडचे ​​प्रमुख नितीश कुमार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दिल्लीहून परतल्यानंतर चौधरी तात्काळ नितीश कुमार यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांना दिल्लीहून मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात सूचना मिळाल्या होत्या. त्या देण्यासाठी ते नितीश कुमार यांच्याकडे गेले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी ३ पर्यंत स्थगित

चांदीच्या अंगठ्यांच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स; जी बघाल ती आवडेल

Rakhi Sawant slams Kangana Ranaut: 'आधी स्वतःचं चारित्र्य पाहा'; कंगना रणौतला चुडैल म्हणत राखी सावंत भडकली

Kalyan : कल्याण हादरलं! काळा तलावात सापडला १७ वर्षीय मुलीचा मृतदेह; पोलिसांनी ३२ कॅमेरे चेक केले अन्...

SCROLL FOR NEXT