Businessman and Former BSP Candidate Navin Kushwaha and Family Found Dead Saam
देश विदेश

निवडणुकीपूर्वी भंयकर घडलं; बड्या नेत्यासह पत्नी अन् मुलीचा संशयास्पद मृत्यू; राजकीय वर्तुळात खळबळ

Businessman and Former BSP Candidate Navin Kushwaha and Family Found Dead: बिहारमध्ये खळबळ. बसपा लोकसभा माजी उमेदवार नवीन कुशवाहा, पत्नी कांचनमाला आणि मुलगी तनु प्रिया हे संशयास्पद परिस्थितीत मृत अवस्थेत सापडले.

Bhagyashree Kamble

  • बसपाचे माजी लोकसभा उमेदवार यांचा मृत्यू.

  • पत्नी अन् मुलीचाही मृत्यू.

  • संशयास्पद परिस्थितीत मृतदेह सापडल्यानं परिसरात खळबळ

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पूर्णियामधून एक महत्वाची आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. बसपाचे माजी लोकसभा उमेदवार आणि प्रख्यात उद्योगपती नवीन कुशवाहा, त्यांची पत्नी कांचनमाला आणि मुलगी तनु प्रिया यांचा शहरातील युरोपियन कॉलनीमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवीन कुशवाहा हे प्रसिद्ध व्यापारी होते. यासह त्यांनी २००९ची लोकसभा निवडणूक पूर्णिया येथून बसपाच्या तिकिटावर लढवली होती. २०१० साली त्यांनी धामदहा येथून अपक्ष उमेदवार म्हणूनही निवडणूक लढवली होती. बुधवारी रात्री झालेल्या या घटनेमुळे केवळ पूर्णियाच नव्हे तर संपूर्ण सीमांचल क्षेत्राला धक्का बसला आहे.

या घटनेनंतर मृताचा भाऊ आणि जेडीयू नेते निरंजन कुशवाह यांनी सांगितले की, मुलगी तनु प्रिया अचानक घरात पडली. तिला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना वडील नवीन कुशवाह देखील पडले. याच धक्क्याने पत्नी कांचनमालाचा मृत्यू झाला. मात्र, डॉक्टरांच्या विधानामुळे प्रकरण गुंतागुंतीचे होत आहे.

रूग्णालयाचे संचालक डॉ. बी.एन कुमार म्हणाले की, 'नवीन कुशवाहाच्या गळ्यात फाशीच्या खुणा आहेत. तर, त्यांची मुलगी तनु प्रियाच्या डोक्याच्या मागच्या बाजूला जखम आहे. कांचन मालाच्या शरीरावर कोणत्याही जखमा दिसून येत नाहीये'.

पूर्णियाचे एसपी स्वीटी सेहरावत म्हणाल्या की, 'नवीन कुशवाहाच्या गळ्यावर दोरीचे निशाण दिसत आहे. त्यांच्या मुलीच्या डोक्यावर जखमेचे निशाण आहे. तर, त्यांची पत्नी गंभीर आजाराने ग्रस्त होती. मृत्यूचे खरे कारण पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर येईल. हा अपघात होता की आत्महत्या? की आणखी काही हे निश्चित होईल', असं पोलीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लातूर हादरलं! मेडिकलमध्ये औषध आणायला गेलेल्या ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

Shocking : चालक आणि नर्सच्या प्रेमाचा धक्कादायक शेवट! गर्लफ्रेंडनेच कुऱ्हाडीने वार करून बॉयफ्रेंडला संपवलं

Maharashtra Live News Update: कल्याणातील रिंगरोड टप्पा ३ च्या कामाला वेग,आठ महिन्यांत पूर्णत्वाचा निर्धार

Rice Eating Tips : दुपारी की रात्री; भात खाण्याची योग्य वेळ कोणती?

Government Employees: केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे नियम केले स्पष्ट; पेन्शनसाठी होणार फायदा

SCROLL FOR NEXT