Bride and Groom Families Clash in Bodh Gaya Saam
देश विदेश

लग्नात 'रसगुल्ले' संपले अन् महाभारत सुरू झालं, वधू-वर पक्षात तुफान राडा; ताटं, खुर्च्या फेकून मारल्या, VIDEO व्हायरल

Bride and Groom Families Clash in Bodh Gaya: बिहारच्या बोधगयामध्ये रसगु्ल्ला संपल्याच्या कारणावरून मोठा वाद निर्माण झाला. वादाचं रूपांतर हाणामारीत झालं.

Bhagyashree Kamble

लग्न ठरताना वधू - वराच्या कुटुंबामध्ये तू-तू मैं-मैं होताना आपण पाहिलं असेल. लग्न ठरल्यानंतरही किंवा लग्न होताना रूसवे फुगवे होतात. पण कधी आपण मारामारी झाल्याचं ऐकलं किंवा पाहिलं आहे का? असाच एक भयंकर प्रकार बिहारच्या बोधगयामध्ये घडला आहे. रसगुल्ले संपल्याच्या कारणामुळे वधू आणि वराच्या कुटुंबात हिंसाचार उसळला. दोन्ही कुटुंबामध्ये वाद झाला, मारामारी झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रसगुल्ला गायब होण्याच्या कारणावरून लग्न रद्द झाले. मात्र, या नंतर वधूच्या कुटुंबाने वराच्या कुटुंबाविरोधात हुंडा मागण्याची तक्रार दाखल केली.

मिळालेल्या माहितीनुसार,ही घटना २९ नोव्हेंबर रोजी बोधगया येथील एका हॉटेलमध्ये घडली. पोलिसांनी सांगितले की, लग्नाचे विधी पूर्ण झाले. यानंतर पुरेसे रसगुल्ला नसल्याचं लक्षात येताच वधूच्या कुटुंबाने गोंधळ घालण्यास सुरूवात केली. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे. सीसीटीव्ही फु़टेजमध्ये वराती खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सभोवती फिरताना दिसत आहेत. परंतु, कुणीही गोंधळ घातलेला नाही.

मात्र, त्यानंतर लवकरच जोरदार हाणामारीला सुरूवात झाली. अनेकांनी खुर्च्या, ताटली आणि इतर वस्तू तोडल्या. पोलिसांनी सांगितले की, दोन्ही कुटुंबातील अनेक जण यात गंभीर जखमी झाले. वराचे वडील महेंद्र प्रसाद यांनी सांगितले की, 'रसगुल्ला न मिळाल्याच्या वादामुळे हाणामारी झाली. मात्र, नंतर वधूच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात हुंड्याची खोटी तक्रार दाखल केली. वराचे कुटुंब लग्नासाठी तयार होते. मात्र, वधूच्या कुटुंबाने शेवटी त्याविरूद्ध निर्णय घेतला'.

वराची आई मु्न्नी देवी यांनी वधूच्या कुटुंबावर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी वादाच्या वेळी वधूला भेट म्हणून दिलेले दागिने चोरल्याचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेनंतर याचा व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai: प्लॅटफॉर्मवर बसून पाहत होता पॉर्न व्हिडीओ, महिलेने तरुणाला धडा शिकवला; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Vrindavan : वृंदावनला जाताय? मग या ७ ठिकाणी नक्कीच भेट द्या

Indian Railway: वंदे भारतच्या २४ फेऱ्या महाराष्ट्रातून, सर्वाधिक जाळं पुण्यात, वाचा कोणती Vande Bharat कुठून धावते?

Pooja-Soham Bandekar Wedding : बांदेकरांची सून अन् लेकाचे लग्नातील Unseen फोटोज, पाहा पूजा-सोहमची केमिस्ट्री

SCROLL FOR NEXT