'तुझा संतोष देशमुख करू', उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी नेत्याला धमकी; पुण्यात नेमकं चाललंय काय?

AAP Leader Receives Death Threat During Fursungi Nagar Parishad Polls: “निवडणुकीतून माघार घ्या अन्यथा संतोष देशमुख करू!” पुण्यात थेट उमेदवाराला धमकी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
AAP Leader Receives Death Threat During Fursungi Nagar Parishad Polls
AAP Leader Receives Death Threat During Fursungi Nagar Parishad PollsSaam
Published On
Summary
  • पुण्यात उमेदवाराला धमकी

  • आम आदमी पार्टीचे उमेदवार यशवंत अरुण बनसोडे यांना धमकी

  • अज्ञात आरोपीवर फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सध्या राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची मतदान प्रक्रिया पार पडतेय. यावेळी राज्यातील विविध भागांत वाद, मतभेद आणि तणावाची परिस्थिती पाहायला मिळत आहे. अशातच पुण्यातील फुरसु्ंगीमधून मोठा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. फुरसुंगी नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या आम आदमी पार्टीच्या उमेदवाराला एका अनोळखी व्यक्तीनं जीवघेणी धमकी दिली.

AAP Leader Receives Death Threat During Fursungi Nagar Parishad Polls
ऐन लग्नसराईत सोनं स्वस्त; चांदीचे दर जैसे थे, १ तोळं सोन्याचा भाव किती?

आम आदमी पार्टीचे उमेदवार यशवंत अरुण बनसोडे (वय वर्ष ४२) यांनी फुरसुंगी नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज फुरसुंगी नगरपरिषदेत निवडणूकीची मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनसोडे हे १ डिसेंबर रोजी सकाळी सासवड रोड रेल्वे स्टेशन परिसरातून त्यांच्या वाहनाने प्रवास करत होते.

AAP Leader Receives Death Threat During Fursungi Nagar Parishad Polls
मतदानाच्या दिवशी बदलापुरात राडा! भाजप- शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये WWF, VIDEO व्हायरल

त्याच वेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांना हात दाखवून त्यांची गाडी थांबवली. गाडी थांबवल्यावर तो व्यक्ती बनसोडेंच्य जवळ गेला. तसेच बनसोडे यांना निवडणुकीतून माघार घेण्याची धमकी दिली. यावरच न थांबता अनोळखी व्यक्तीनं, "माघार नाही घेतली तर तुमचा संतोष देशमुख करू" अशी धमकी दिली.

AAP Leader Receives Death Threat During Fursungi Nagar Parishad Polls
मोठी बातमी! ३ की २१ डिसेंबर, राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी कधी ? कोर्टात आज होणार फैसला

यानंतर बनसोडे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. बनसोडे यांच्या तक्रारीनुसार, त्या व्यक्तीच्या कमरेला लोखंडी शस्त्र लपवलेले होते. एवढेच नव्हे तर रेल्वे पटरीजवळ दुसरा एक अनोळखी व्यक्ती उभा असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदेची निवडणूक स्थगित केली आहे.

AAP Leader Receives Death Threat During Fursungi Nagar Parishad Polls
१९ मिनिटांच्या MMS व्हिडिओनं धुमाकूळ घातला; Forward कराल तर फसाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com