वैशाली जिल्ह्यात राघोपूरजवळ बोट नदीत उलटल्याची मोठी दुर्घटना
बोटीतून सुमारे २० जण प्रवास करत असल्याची माहिती
बोटीवरील नियंत्रण सुटल्याने बोट उलटल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
बिहारमधील वैशाली जिल्ह्यात, राघोपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामपूर श्यामचंद गावाजवळ एक बोट उलटल्याने ११ जणांचा मृत्यू झाल्याची मोठी दुर्घटना घडलीय. हाती आलेल्या माहितीनुसार या बोटीतून २० जण एका मेजवानीच्या कार्यक्रमासाठी जात होते. बोट नदीतून दुसऱ्या किनाऱ्याकडे जात असताना बोटीवरील नियंत्रण सुटले आणि ती उलटली, ज्यामुळे त्यातील लोक बुडाले.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी एका मेजवानीच्या कार्यक्रमासाठी काही तरूण बोटीतून प्रवास करत होती. बोट नदीच्या मध्यभागी पोहोचली असता खलाशाचं बोटीवरील नियंत्रण सुटलं आणि बोट उलटली. अचानक बोट उलटल्यानं लोकांना जीव वाचण्याची संधी मिळाली नाही. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवले.
माहिती मिळताच राघोपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वरिष्ठ जिल्हा अधिकाऱ्यांना या घटनेची कल्पना दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी एसडीआरएफ (SDRF) पथक रवाना केले. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच गावात शोककळा पसरलीय. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून नदीत बुडालेल्यांचा शोध घेतला जातोय.
चौकशीनंतरच बोट उलटण्यामागची कारणे स्पष्ट होतील. तसेच, बोटीवर नेमके किती लोक होते आणि अपघातानंतर किती जणांची सुटका करण्यात आली. बोटीची क्षमता, प्रवाशांची संख्या आणि सुरक्षिततेची व्यवस्था यांसारख्या बाबींचीही चौकशी केली जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.