Nitish Kumar Saam Tv
देश विदेश

Bihar News: बिहार विधानसभा सुरक्षा रक्षक भरती परीक्षा रद्द, मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा मोठा निर्णय

Nitish Kumar News: बिहार विधानसभेत सुरक्षा रक्षक पदांच्या भरतीसाठी घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आता यासाठी नव्याने परीक्षा होणार आहे. परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर केली जाईल.

Satish Kengar

Bihar News:

बिहार विधानसभेत सुरक्षा रक्षक पदांच्या भरतीसाठी घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आता यासाठी नव्याने परीक्षा होणार आहे. परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर केली जाईल. सुरक्षा रक्षकच्या (मार्शल) ६९ पदांसाठी थेट भरतीसाठी १० सप्टेंबर रोजी प्राथमिक परीक्षा घेण्यात आली होती. यात २७ हजारांहून अधिक उमेदवारांनी सहभाग घेतला होता. यानंतर यावर्षी १९ ते २२ जानेवारी दरम्यान उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली होती.

यातच परीक्षा घेण्यात पारदर्शकता नसल्याची तक्रार विधानसभा सचिवालयाकडे आली होती. विधानसभा सचिवालयालाही यासंदर्भात अहवाल प्राप्त झाला होता. त्याआधारे विचार करून सुरक्षा रक्षकांसाठी जाहिरात क्रमांक ०१/२०२३ अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला, असं सांगण्यात येत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्य विधानसभा सचिवालयाचे उपसचिव राम कुमार यादव यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, 'प्राप्त झालेल्या अहवालाचा विचार केल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्याचा तपशील बिहार विधानसभेच्या वेबसाइटवर नंतर अपलोड केला जाईल. (Latest Marathi News)

बिहार विधानसभेचे अध्यक्ष आनंद किशोर यादव यांनी या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे सांगितले. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि विधानसभा अध्यक्षांचे आभार मानले आहेत. महाआघाडी सरकारचा निर्णय रद्द करण्याचा एनडीए सरकारचा हा पहिलाच निर्णय आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात बिहार सरकारने महाआघाडी सरकारमध्ये समाविष्ट असलेल्या राजदच्या मंत्र्यांच्या कामाचा आणि घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेण्याचे आदेश जारी केले होते. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी म्हणाले, 'आमचे सरकार भ्रष्टाचारावर कारवाई करेल. भूतकाळात काही चूक झाली असेल तर ती दुरुस्त केली जाईल. सर्व निर्णयांचा संपूर्ण आढावा घेतला जाईल.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

Maharashtra Assembly Election : खासदार वडिलांपेक्षा मुलाची संपत्ती तिप्पट, विलास भुमरेंकडे ३३ कोटींपेक्षा जास्त संपत्ती!

Chhagan Bhujbal Net Worth: संपत्तीत ८२ लाखांची वाढ, डोक्यावर ४४ लाखांचे कर्ज; छगन भुजबळांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT