Exit poll trends indicate decline in BJP seats, while JDU gains momentum under Nitish Kumar’s leadership. saam tv
देश विदेश

Bihar Exit Poll: भाजपच्या जागांमध्ये घसरगुंडी,नितीश कुमारांच्या JDUची सरशी; जाणून घ्या एक्झिट पोलचा अंदाज

Bihar Assembly Exit Poll: बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसरा टप्पा पार पडल्यानंतर एक्झिट पोल जाहीर करण्यात आलेत. या पोलमध्ये धक्कादायक आकडे समोर आलेत. बिहारमधील भाजपची ताकद कमी होताना दिसत आहे.

Bharat Jadhav

  • एक्झिट पोलमध्ये भाजपच्या जागांमध्ये घट दिसते.

  • एक्झिट पोलनुसार एनडीए पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे.

  • एनडीएमधील जेडीयूच्या जागा वाढताना दिसत आहेत.

बिहार विधानसभा निवडणुकांचा दुसरा टप्पा पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आलेत. एक्झिट पोलचे आकडे एनडीए आणि महागठबंधनची धकधक वाढवणारे आहेत. संध्याकाळी ६ वाजता विधानसभा निवडणुकांचा दुसरा टप्पा पार पडला. यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता एक्झिट पोलचा अंदाज जाहीर करण्यात आलेत. यात भाजपची चिंता वाढवणारे आकडे एक्झिट पोलमधून समोर आलेत.

या एक्झिट पोलनुसार, बिहार राज्यात नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार पुन्हा सत्तेत येणार असल्याचं दिसत आहे, मात्र एक-एका पक्षाला मिळालेल्या जागा कमी आहेत. बिहार निवडणुकीसाठीच्या पोलस्ट्रॅट एक्झिट पोलनुसार, एनडीएमध्ये भाजपला ६८-७२, जेडीयूला ५५-६०, एलजेपी (आर)ला ९-१२, एचएएमला १-२ आणि आरएलएमला ०-२ जागा मिळतील असे दिसून येत आहे.

बिहार विधानसभा निवडणुका दोन टप्प्यात पार पडल्या. ६ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यात ६५.०८ टक्के इतके विक्रमी मतदान झाले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातही मतदारांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी महिला आणि तरुण मतदारांचा सहभाग जास्त होता. दुसऱ्या टप्प्यात ६७.१४ टक्के मतदान झालं. यामुळे येथील वाढलेलं मतदान पाहून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आपल्या विजयाचा दावा केला. मात्र हाती आलेल्या एक्झिट पोलनुसार महागठबंधनचा पराभव होणार असल्याचं चित्र दिसत आहे.

एक्झिट पोलमध्ये NDA ला १३३-१४८ जागा मिळण्याचा अंदाज

POLSTRAT ने बिहार निवडणुकीसाठीचा एक्झिट पोल प्रसिद्ध केला आहे. यात NDA ला १३३-१४८ जागा, महाआघाडीला ८७-१०२ आणि इतरांना ३-५ जागा मिळतील असा, अंदाज आहे.

चाणक्य स्ट्रॅटेजीज पोलमध्ये एनडीएला १३०-१३८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. चाणक्य स्ट्रॅटेजीजमध्ये एनडीएला १३०-१३८ जागा, महाआघाडीला १००-१०८ आणि इतरांना ३-५ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

आधी २०२० च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर एनडीएने बिहारमध्ये सरकार बनवलं होतं. एनडीएने एकूण १२५ जागा जिंकल्या, तर महागठबंधनने ११० जागा जिंकल्या होत्या. ७५ जागांसह आरजेडी सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता.

एनडीए आघाडीच्या जागा

भाजप ७४

जेडीयू - ४३

विकासशील इंसान पार्टी (VIP) - ४

हिंदुस्थानी अवाम मोर्चा (HAM)- ४

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Brothers : महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक क्षण! आज दुपारी 12 वाजता घोषणा, ठाकरे बंधूंची युती कुठे कुठे होणार?

New Rules 2026: १ जानेवारी २०२६ पासून ६ नियम बदलणार, कर्मचाऱ्यांपासून ते शेतकऱ्यांवर होणार परिणाम, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का, दोन माजी नगरसेवकांचा ही जय महाराष्ट्र

Mahapalika Election : एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाण यांच्यात पहाटे ४ वाजेपर्यंत बैठक, राज्यातील जागावाटपावर शिक्कामोर्तब?

Kokum Chutney Recipe : कोकण स्पेशल आंबटगोड कोकम चटणी, वाढेल जेवणाची रंगत

SCROLL FOR NEXT