Bihar Elections Result 2025 saam tv
देश विदेश

Bihar Election Result: बिहारमध्ये कुणाची सत्ता येणार? उमेदवारांची धाकधूक वाढली, कुठे पाहाल निकाल?

Bihar Elections Result 2025: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल शुक्रवारी लागणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निकाल जाहीर होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. हा निकाल कुठे पाहाल? वाचा सविस्तर...

Priya More

Summary -

  • बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल १४ नोव्हेंबर रोजी लागणार

  • राज्यातील ४६ केंद्रांवर मतमोजणी प्रक्रिया पार पडणार

  • एनडीए आणि महाआघाडी यांच्यात चुरशीची लढत

  • ५ वाजेपर्यंत बिहारमध्ये कोण सत्ते येईल हे चित्र स्पष्ट होईल

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. निकाल लागण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल १४ नोव्हेंबरला म्हणजेच शुक्रवारी लागणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारांची धकधक वाढली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील ४६ मतमोजणी केंद्रावर मतमोजणी केली जाणार आहे. पोस्टल मतपत्रिकांची मोजणी शुक्रवारी सकाळी ८ वाजता सुरू होईल. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता ईव्हीएमची मोजणी सुरू करण्यात येईल.

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी २४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. याठिकाणी दोन टप्प्यांमध्ये मतदान झाले. त्यांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद झाले असून त्याचा निकाल शुक्रवारी लागणार आहे. कोण जिंकणार आणि कोणाला अपयश येणार हे शुक्रवारी निकाल लागल्यानंतर स्पष्ट होईल. या निवडणुकीमध्ये एनडीए आणि महाआघाडीमध्ये चुरशीची लढत झाली होती. बिहार विधानसभेमध्ये बहुमतासाठी एनडीए आणि महाआघाडीला १२२ जागांची आवश्यकता आहे.

भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मतमोजणीच्या तयारीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मतमोजणी केंद्रावर सुरक्षा आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी कडक प्रोटोकॉल स्थापित करण्यात आले आहेत. मतमोजणी स्थळी कोणालाही मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी नसणार आहे. तसंच, संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची आणि व्हिडिओग्राफीद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. पण मतमोजणी थेट प्रक्षेपित केली जाणार नाही.

आयोगाने सर्व निवडणूक अधिकारी, मतमोजणी पर्यवेक्षक, सूक्ष्म निरीक्षक आणि सहाय्यकांना सूचना दिल्या आहेत की, मुक्त, निष्पक्ष, धाडसी आणि पारदर्शक मतमोजणी करणे ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. मतमोजणीच्या दिवशी बिहारमध्ये हजारो अधिकारी, कर्मचारी, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी मतदान केंद्रावर उपस्थित राहतील. बिहारच्या ३८ जिल्ह्यांमध्ये ४६ मतमोजणी केंद्रावर मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.

बिहार विधानसा निवडणुकीसाठी मतमोजणी ही सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होईल. सकाळी काही तासांत निवडणुकीचा कल स्पष्ट होईल. तर अंतिम निकाल सायंकाळी ५ वाजता लागू शकतो. बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहण्यासाठी साम टीव्ही मराठीच्या वेबसाईटवर तसंच युट्यूब चॅनेलवर (https://www.youtube.com/@SaamTV/streams) तुम्हाला निकालाचे अचूक अपडेट आणि विश्लेषण पाहायला मिळेल. तसंच साम टीव्ही वृत्तवाहिनीवर तुम्हाला दिवसभर निकालाचे अपडेट आणि विश्लेषण लाईव्ह पाहता येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहारचा कौल कुणाला? लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT