Bihar Accident Saam Tv
देश विदेश

Accident: मध्यरात्री अपघाताचा थरार, भरधाव कार वरातीमध्ये घुसली; तिघांचा जागीच मृत्यू, १६ गंभीर

Bihar Accident: बिहारमध्ये भीषण अपघात झाला. भरधाव कार वरातीमध्ये घुसली. या कारने अनेकांना चिरडलं. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू तर १६ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

Priya More

Summary -

  • बिहारच्या बेतियातील बिशुनूर्वा गावाजवळ भीषण अपघात झाला

  • वरातीत भरधाव कार घुसली

  • अपघातात ३ तरुणांचा मृत्यू तर १६ गंभीर जखमी झाले

  • अपघातानंतर कारचालक फरार झाला

बिहारच्या बेतियामध्ये भरधाव कारने अनेकांना चिरडलं. लग्नाच्या वरातीमध्ये सहभागी होण्यासाठी निघालेल्या वऱ्हाडींना कारने चिरडलं. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर १६ जण गंभीर जखमी झाले. ही घटना बेतिया-बगाल राष्ट्रीय महामार्गावरील बिशुनुरवा गावाजवळ घडली. या अपघातानंतर गावात एकच गोंधळ उडाला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बेतिया-बगहा राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास घडली. बिशुनूर्वा गावाजवळ अनियंत्रित कार लग्नाच्या वरातीमध्ये घुसली. या कारने अनेकांना चिरडत नेले. या अपघातामध्ये ३ तरुणांचा मृत्यू झाला. तर १६ जण जखमी झाले. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

या अपघाताच्या घटनेमुळे लगीन घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रुग्णालयाबाहेर जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांनी आक्रोश केला. पोलिसांनी सांगितले की, शिकारपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धूमनगर मटियरिया गावातून लग्नासाठी वऱ्हाडी बिशुनूर्वा गावात पोहचले होते. त्याचवेळी ही भयंकर अपघाताची घटना घडली.

बिशुनूर्वा गावात पोहचल्यानंतर याठिकाणी सर्व वऱ्हाडींनी नाश्ता केला आणि ते रस्त्यावरून जात होते. त्याचवेळी बगहावरून येणाऱ्या भरधाव कारने या सर्वांना चिरडत नेले. दिनेश कुशवाह याच्यासह तिघांचा अपघातामध्ये मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक फरार झाला. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बुरखा घालून येणार्या महिला मतदारांना ओळखण्यासाठी 'पडदानशिन' महिला कर्मचार्याची नियुक्ती होणार

Crime News : लग्नाचं आमिष दाखवून 25 वर्षीय तरुणीवर अत्याचार; बीड पोलिसाचं हादरवणारं कृत्य

धक्कादायक! बायकोचे बॉयफ्रेंडशी प्रेमसंबंध उघड; संतापलेल्या नवऱ्याकडून पोलीस स्टेशनमध्येच पत्नीची गोळ्या झाडून हत्या

India Travel : जगातील ५ सर्वात स्वस्त टूरिस्ट प्लेसेस, आयुष्यात एकदा तरी या ठिकणाला भेट द्या

Adhik Maas 2026: हिंदू नववर्ष 2083 मध्ये 12 नव्हे तर असणार 13 महिने; जाणून घ्या यागामचं धार्मिक कारण

SCROLL FOR NEXT