कटिहारमध्ये बस आणि पिकअपची समोरासमोर धडक
अपघातात १० जणांचा मृत्यू, २५ जण जखमी
बस चालक दारूच्या नशेत असल्याचा संशय
बिहारमधील कटिहार येथे एक भीषण रस्ते अपघात झाला आहे. कोइरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या भीषण अपघातात १० जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग ३१ वरील दातपूर मुसाहरी चौकाजवळ एक बस आणि पिकअप व्हॅनची समोरासमोर जोरदार धडक झाली. तो अपघात इतका भीषण होता की, धडकेत दोन मोटरसायकलदेखील आल्या असून त्यावरील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस हरदाहून पूर्णियाला जात होती. या बसचा चालक नशेत होता. या बसने पिकअपसह इतर वाहनांही धडक दिली होती. दरम्यान बस दातपूर मुसाहरी चौकाजवळ पोहोचली असताना समोरून येणाऱ्या एका पिकअप व्हॅनला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, रस्त्यावरून जाणाऱ्या इतर दोन दुचाकीही त्या धडकेत आल्या आहेत.
घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्थानिक गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी तात्काळ बचावकार्याला सुरुवात केली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आले आहे. संपूर्ण परिसरात दुःखाचे वातावरण पसरले होते, सर्वत्र आक्रोश ऐकू येत होता.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, अपघातात आतापर्यंत १० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. २५ हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. बसने पिकअप ट्रक समोरून धडक दिल्याने हा अपघात झाला. बस चालक दारूच्या नशेत होता, असे लोकांनी सांगितले. या अपघातात दोन दुचाकींनाही धडक बसली. या अपघातात बसमधील चार जणांचा मृत्यू झाला. जखमींना मदत करण्यासाठी गर्दी जमली होती.
कटिहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी संध्याकाळी कोइरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गेदाबरहीजवळ बस आणि पिकअप ट्रक यांची धडक झाली. यात आतापर्यंत १० जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदत व बचाव कार्याला सुरुवात केली. अपघातात जखमी झालेल्या अंदाजे २५ जणांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.