Bihar Farmer  navi
देश विदेश

Crorepati Farmer: ७५ वर्षीय शेतकऱ्याच्या खात्यात आले १ कोटी, बँकेत पासबूक अपडेट केलं अन्...

Bharat Jadhav

Bihar 75 year Old Farmer Become Crorepati:

तुम्ही बँकेत पासबूक अपडेट करायला गेल्यात आणि खात्यात एक थेट कोटी रुपये आल्याचं दिसलं तर....काय सांगता पायाखालची जमीन सरकेल? काय म्हणता तुम्ही स्तब्ध होऊन तुमच्या तोंडातून एकही शब्द निघणार नाही, अशीच गत एका शेतकऱ्याची झालीय. पासबूक अपडेट करायला गेला अन् शेतकऱ्याला सुखद धक्का बसला. तो ही थेट एक कोटींचा.(Latest News)

ही गत घडलीय बिहारमधील भागलपूर येथील शेतकऱ्यासोबत (Farmer ). एकाच दिवसात कोट्यवधी रुपये बँक खात्यात (bank Account) आल्यानंतर सर्व गावात चर्चा रंगली. शेतकऱ्याच्या खात्यात पैसे कसे आले, कोणी टाकले, अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली. शेतकऱ्याच्या खात्यात एक कोटी रुपये गेल्याचं समजताच बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांचं खातं ब्लॉक केलं. खातं का ब्लॉक केलं याची विचारणा शेतकऱ्याने केली तेव्हा, त्यांना पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागली.

मूळात शेतकऱ्याच्या खात्यात एक कोटी रुपये येण्याला बँक कर्मचारीच जबाबदार असल्याचं सांगण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे आले त्यांचे नाव संदीप मंडल असून त्यांचे वय ७५ वर्ष आहे. त्यांनी आपल्या मुलाला एसबीआय बँकेत पासबूक अपडेट करण्यासाठी पाठवले होते. त्यावेळी त्या मुलाला बँक खाते ब्लॉक करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. बँक खाते का ब्लॉक करण्यात आलं ते कारण ऐकून मंडल यांच्या मुलाला धक्काच बसला.

बँकेच्या कर्मचार्‍यांनी त्यांना सांगितले की कुठून तरी खात्यात एक कोटी रुपये आले आहेत. या कारणास्तव खाते गोठवण्यात आले आहे. हे ऐकून संदीप मंडल यांचा मुलगा स्तब्ध झाला. तो घरी परतला आणि त्याने वडिलांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर शेतकरी संदीप मंडल यांनी बँकेत धाव घेतली. बँक मॅनेजरकडून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की त्यांचे खाते गोठवण्यात आले आहे. या संदर्भात सायबर पोलीस ठाण्यात जाऊन अर्ज करा. तिथून अहवाल आल्यावरच पुढील कार्यवाही केली जाईल असे बँकेकडून सांगण्यात आलं.

शेतकरी संदीप मंडल म्हणाले की, त्यांच्या एसबीआय बँक खात्यात फक्त त्यांची वृद्धापकाळ पेन्शन आणि प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे पैसे येतात. पण त्यांच्या खात्यात कोटींची रक्कम त्यांच्या संमतीशिवाय खात्यात वर्ग करण्यात आली. दरम्यान एवढी मोठी रक्कम अचानक बँक खात्यात आल्याने गरीब शेतकऱ्यांच्या अडचणीतही वाढ झाली.

दरम्यान या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी सुनील कुमार पांडे म्हणाले की, तपासादरम्यान संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात सुमारे एक कोटी रुपये आल्याचे आढळून आले. याप्रकरणी तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातही एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबतची नोटीसही संबंधित बँकेला पाठवण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT