Rahul Gandhi speech Latest News saam tv
देश विदेश

Rahul Gandhi Speech : भारताला सर्वात मोठा धोका....विदेशात जाऊन पुन्हा बोलले राहुल गांधी, भाजप संतापला

Rahul Gandhi Speech in Colambia : राहुल गांधी यांनी कोलंबियातील विद्यापीठात इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका आहे, असं ते म्हणाले. यावरून भाजप आक्रमक झाला आहे.

Nandkumar Joshi

  • कोलंबियातून राहुल गांधींचा केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

  • लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका असल्याचे विधान

  • राहुल गांधींच्या विधानावरून राजकारण तापलं

  • भाजपचा राहुल गांधींवर प्रतिहल्ला

काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी कोलंबियातून केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. भारतात लोकशाहीवर हल्ला होत आहे आणि हाच देशासाठी सर्वात मोठा धोका आहे, असं ते म्हणाले. भारतात सध्याच्या घडीला लोकशाही व्यवस्थेवर सर्व बाजूने हल्ले होत आहेत, असे ते म्हणाले. राहुल गांधींचे हे विधान भाजपला खटकले आणि राहुल गांधींवर प्रतिहल्ला चढवला. विदेशात जाऊन भारताची बदनामी करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

कोलंबियातील एका विद्यापीठात इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना राहुल गांधी यांनी संबोधित केले. ते म्हणाले की, 'भारतात अनेक परंपरा, धर्म आणि भाषा आहेत. लोकशाही व्यवस्थेत सर्वांनाच स्थान देण्यात आलेले आहे. पण सध्याच्या घडीला लोकशाही व्यवस्थेवर सर्व बाजूने हल्ले होत आहेत.' भारत संपूर्ण जगाला खूप काही देऊ शकतो आणि त्याबाबत खूपच आशावादी आहे. पण काही उणीवा देखील आहेत. जोखीम देखील आहे, ते आव्हान भारताला पार करावे लागेल. लोकशाहीवर होणारा हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका आहे, असंही राहुल म्हणाले.

वेगवेगळ्या परंपरा, धर्म आणि विचार एकत्रित येण्यासाठी एका विशिष्ट ठिकाणाची आवश्यकता असते. ते ठिकाण तयार करण्याचा योग्य मार्ग म्हणजे लोकशाही व्यवस्था आहे. पण वर्तमानात भारताच्या लोकशाही व्यवस्थेवर मोठे हल्ले होत आहेत, असेही राहुल गांधी म्हणाले.

दुसरा धोका म्हणजे विविध भागांत पडलेली फूट. जवळपास १६-१७ भाषा आणि वेगवेगळे धर्म आहेत. या वेगवेगळ्या परंपरा कायम ठेवणे, आपल्या अभिव्यक्तीला स्थान देणे हे भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहे. लोकांची गळचेपी करणे आणि हुकूमशाही व्यवस्था चालवण्याचे काम चीन करतोय, ते आपण करू शकत नाही, याकडेही त्यांनी लक्ष्य वेधले.

भाजपचा प्रतिहल्ला

राहुल गांधी यांनी केलेल्या टिप्पणीवरून राजकारण तापलं आहे. भाजपनं त्यांच्यावर प्रतिहल्ला केला आहे. भाजपचे प्रवक्ता शहजाद पूनावाला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. राहुल गांधी पुन्हा प्रपोगंडा लीडरसारखे वागत आहेत. विदेशात जाऊन भारतीय लोकशाहीवर हल्ला करत आहेत. शेवटी ते भारताशीच लढत आहेत. आपल्या अंतर्गत विषयात कधी अमेरिका, तर कधी ब्रिटनला हस्तक्षेप करण्याची मागणी करतात. आता या ठिकाणीही तेच, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे अजित पवार यांच्या भेटीला

Face care: डाग आणि पिग्मेंटेशन कमी करुन ग्लोईंग चेहरा हवाय; मग रात्री झोपताना घरी तयार केलेलं 'हे' होममेड सीरम नक्की लावा

Shukra Asta 2025: धन दाता शुक्र होणार अखेर अस्त; या राशींच्या आयुष्यात येणार अडचणी

Maharashtra Politics: अजित पवारांनी मोठा डाव टाकला; एकाच दिवशी भाजप आणि उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का

Mumbai Travel : 2025 ला निरोप अन् नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत, मुंबईकरांनो न्यू इयरला 'या' ठिकाणी नक्की जा

SCROLL FOR NEXT