Rain Alert : पुढील ५ दिवस अत्यंत महत्वाचे, महाराष्ट्रासह १५ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

IMD Forecasts : महाराष्ट्रातील कोकण, मराठवाडा आणि घाटमाथ्यासह देशभरातील १५ राज्यांना पुढील पाच दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Rain Alert : पुढील ५ दिवस अत्यंत महत्वाचे, महाराष्ट्रासह १५ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा
Heavy rain alert: IMD warns of intense rainfall across 15 states including Maharashtra, Delhi, and Goa in the next five days.saam tv
Published On

IMD Rain Alert : भारतीय हवामान खात्यानं पुढील पाच दिवसांसाठी दिल्ली-एनसीआरसह १५ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्यानं आदल्या दिवशी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार आज, दिल्ली-एनसीआरमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला नव्हता. मात्र, हवामानात अचानक बदल झाला. सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाल्यानंतर दिल्ली एनसीआरमध्ये ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. महाराष्ट्रातील कोकण, गोवा ३ आणि ४ ऑक्टोबरला, तर ४ ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राजस्थानच्या पूर्वेकडे कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं उत्तर भारतात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ६ ऑक्टोबरपर्यंत जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थानमधील काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पावसाची रिपरिप असेल. याशिवाय ४ आणि ५ ऑक्टोबरला उत्तर प्रदेशचा पूर्वेकडील भाग, २ ऑक्टोबरला राजस्थान आणि ४ ते ६ ऑक्टोबरला जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये ५ आणि ६ ऑक्टोबरला उत्तर प्रदेशचा पश्चिम भागात पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.

१ ऑक्टोबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत सौराष्ट्र आणि कच्छमध्ये मुसळधार पाऊस कोसळेल, तर बहुतांश भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल. ३ आणि ४ ऑक्टोबरला कोकण आणि गोव्यात पावसाचा अंदाज आहे. ४ ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा घाट परिसरात पावसाचा अंदाज आहे.

पूर्व आणि मध्य भारतात मुसळधार पाऊस

पश्चिम बंगालच्या किनारी भागात २ ते ४ ऑक्टोबर, झारखंडमध्ये २ ते ६ ऑक्टोबरच्या दरम्यान, बिहारमध्ये ४ आणि ५ ऑक्टोबर, मध्य प्रदेशात १ ऑक्टोबर ते १ ऑक्टोबर, छत्तीसगड, ओडिशामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. सिक्किममध्ये ३ ते ५ ऑक्टोबर या काळात मुसळधार पावसाची शक्यता आहे. अंदमान आणि निकोबारमध्ये बहुतांश ठिकाणी हलक्या आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. २ ते ५ ऑक्टोबर या कालावधीत पश्चिम बंगाल आणि सिक्किममध्ये पावसाचा अंदाज आहे.

Rain Alert : पुढील ५ दिवस अत्यंत महत्वाचे, महाराष्ट्रासह १५ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Rainfall: राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच, कोकण- घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्राला येलो अलर्ट; दसऱ्यानंतर पाऊस ओसरणार

पुढील ४ ते ५ दिवस ईशान्येकडील राज्यांमधील काही ठिकाणी हलका, मध्यम आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. ३ ऑक्टोबरला आसाम आणि मेघालयात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आंध्र प्रदेशातील किनारी भागात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ३० सप्टेंबरला रायलसीमा, तामिळनाडूत उत्तरेकडे मुसळधारेचा अंदाज आहे. ३ ते ५ ऑक्टोबर या काळात तेलंगणा आणि ३ ते ४ ऑक्टोबरला तामिळनाडूत वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशचा किनारी भाग, रायलसीमा, तेलंगणात ४ ऑक्टोबरला पाऊस कोसळण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Rain Alert : पुढील ५ दिवस अत्यंत महत्वाचे, महाराष्ट्रासह १५ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Farmers : हातातोंडाशी आलेला घास पाण्यात, शेतातील कपाशीचं पीक वाया; शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com