Gujrat- ABG Shipyard Saam TV
देश विदेश

Gujrat: देशातील सर्वात मोठा बँक घोटाळा! 28 बँकांना 22,842 कोटींचा चुना

संबंधीत कंपनी जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्तीचे काम करते.

वृत्तसंस्था

गुजरात: गुजरातमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठी घोटाळा उघड झाला आहे. कंपनीने तब्बल 28 बँकांना गंडा घातला आहे. सीबीआयने हा घोटाळा उघड केला आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (CBI) ने एबीजी शिपयार्ड (ABG Shipyard) आणि तत्कालीन अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल (Rushi ) यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 22,842 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 28 बँकांवर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. (Gujrat Banking Froud)

संबंधीत कंपनी जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्तीचे काम करते. त्याचे शिपयार्ड गुजरातमधील दहेज आणि सुरत येथे आहेत. या कंपनीतील एकूण 8 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरनुसार, घोटाळ्याची वेळ एप्रिल 2012 ते जुलै 2017 सांगितली आहे. सीबीआयने नोंदवलेला हा सर्वात मोठा बँक फसवणूकीचा गुन्हा आहे.

बँकिंग फसवणुकीतील सर्वात मोठा घोटाळा

एसबीआयच्या डीजीएमने गुजरातमधील अनेक कंपन्यांवर 22,842 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. हा घोटाळा बँकिंग फसवणुकीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा म्हणता येईल कारण हा नीरव मोदीपेक्षाही मोठा घोटाळा आहे. सीबीआयच्या एफआयआरनुसार फसवणूक करणाऱ्या दोन कंपन्या मुख्य आहेत. एबीजी शिपयार्ड आणि एबीजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड अशी त्यांची नावे आहेत. या दोन्ही कंपन्या एकाच समूहातील आहेत.

LIC चाीही 136 कोटींची फसवणुक

FIR नुसार, या कंपनीने सर्व नियम आणि कायदे झुगारून बँकांच्या समूहाची फसवणूक केली. बँकांसोबतच एलआयसीचेही 136 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. SBI ला 2,468 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बँकांमधून फसवणूक करून परदेशातही पैसे पाठवले गेले आणि अनेक मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप आहे. सर्व नियम-कायदे पाळत एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत पैसे पाठवले जात होते.

एसबीआयच्या तक्रारीनुसार, कंपनीकडे आयसीआयसीआय बँकेचे 7089 कोटी रुपये, आयडीबीआय बँकेचे 3634 कोटी रुपये, बँक ऑफ बडोदाचे 1614 कोटी रुपये, पंजाब नॅशनल बँकेचे 1,244 कोटी रुपये, इंडियन ओव्हरसीज बँकेचे 1,228 कोटी रुपये आहेत.

दीड वर्षांहून अधिक काळ "तपास"

बँकेने 8 नोव्हेंबर 2019 रोजी प्रथम तक्रार दाखल केली होती, ज्यावर सीबीआयने 12 मार्च 2020 रोजी काही स्पष्टीकरण मागितले होते. बँकेने त्याच वर्षी ऑगस्टमध्ये नवीन तक्रार दाखल केली. दीड वर्षांहून अधिक काळ "तपास" केल्यानंतर, सीबीआयने 7 फेब्रुवारी 2022 रोजी एफआयआर दाखल केलेल्या तक्रारीवर कारवाई केली.

अग्रवाल व्यतिरिक्त, एजन्सीने तत्कालीन कार्यकारी संचालक संथानम मुथास्वामी, संचालक - अश्विनी कुमार, सुशील कुमार अग्रवाल आणि रवी विमल नेवेटिया आणि आणखी एक कंपनी एबीजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावर गुन्हेगारी कट, फसवणूक, विश्वासघात आणि गुन्हेगारी भंग यांसारख्या कथित गुन्ह्यांसाठी गुन्हा दाखल केला आहे.

अनेक गुन्हे दाखल

SBI सोबत, 28 बँका आणि वित्तीय संस्थांनी कंपनीला 2468.51 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. फॉरेन्सिक ऑडिटमध्ये असे उघड झाले आहे की 2012-17 दरम्यान, आरोपींनी कथितपणे संगनमत करून बेकायदेशीर कृत्ये केली, ज्यात पैशाचा गैरवापर आणि गुन्हेगारी विश्वासाचा भंग यांचा समावेश आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

Maharashtra Live News Update: शक्तीपीठ महामार्गामुळे राधानगरी ,करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील गावांना बसणार फटका

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

SCROLL FOR NEXT