Coromandel Express Accident Latest Updates Saam TV
देश विदेश

Coromandel Express Accident: ओडिशा रेल्वे दुर्घटना प्रकरणात मोठी अपडेट; अपघाताचं खरं कारण कळालं

Odisha Train Accident Updates: चौकशी समितीने आपला तपास पूर्ण केला असून अपघाताची कारणे शोधून काढली आहेत. या अपघाताचं खरं कारण समोर आलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Odisha Train Accident Big Updates: ओडिशा राज्यात शुक्रवारी (दि. २ जून) कोरोमंडल एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडीचा भयानक अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ८०३ प्रवाशी जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अशात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी सकाळी बालासोर रेल्वे अपघातस्थळी पोहोचून सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. (Latest Marathi News)

यावेळी रेल्वेमंत्र्यांनी काल पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) दिलेल्या निर्देशानुसार काम वेगाने सुरू असल्याचे सांगितले. त्याचबरोबर चौकशी समितीने आपला तपास पूर्ण केला असून घटनेची कारणे शोधून काढली आहेत. या अपघाताचं खरं कारण समोर आलं आहे. लवकरच रिपोर्ट सादर केला जाईल, असंही अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, ज्या ठिकाणी हा अपघात झाला तिथे रेल्वेट्रॅक पूर्णपणे उखडले होते. या ट्रॅकची दुरूस्ती करण्याचं काम पूर्ण झालं असून आता फक्त वीज दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे. संपूर्ण ट्रॅक सुरू करण्यासाठी बुधवारी सकाळपर्यंत निर्धारित केलेले उद्दिष्ट पूर्वीप्रमाणेच सुरळीत सुरू होईल, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. असंही ते म्हणाले.  (Maharashtra Political News)

ओडिशा रेल्वे अपघात नेमका कसा आणि का झाला?

प्राथामिक माहितीनुसार, सिग्नलमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandel Express Accident) एका बाजूच्या ट्रॅकमध्ये शिरली. ज्याला लूप लाइन म्हणतात. त्यावर काही मीटर पुढे एक मालगाडी उभी होती. वरिष्ठ रेल्वे अधिकार्‍यांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, दोन गाड्या ज्या मार्गावर आदळल्या तो ट्रॅक मोठ्या प्रमाणात गंजलेला होता, त्यामुळे हा इतका भीषण अपघात झाला.

दरम्यान, बालासोर रेल्वे दुर्घटनेच्या तपासासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. अॅड विशाल तिवारी यांनी ही याचिका दाखल केली असून सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग स्थापन करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

या आयोगाने 2 जून 2023 रोजी झालेल्या ओडिशा रेल्वे अपघाताच्या कारणांची अनेक पैलूंवरून चौकशी करावी. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील तज्ञ आयोगाची स्थापना करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

SCROLL FOR NEXT