संजय जाधव, साम टीव्ही
Samruddhi Mahamarg Accident News: विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरू आहे. अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने सुरू केलेल्या विविध उपाययोजना फोल ठरल्याचं दिसून येत आहे. शनिवारी ( ३ जून) रात्री समृद्धी महामार्गावर तीन वेगवेगळ्या ठिकाणी विचित्र अपघात झाले. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ४ जण जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या अपघातात समृद्धी महामार्गावरून (Samruddhi Mahamarg) प्रवास करताना बुलढाण्याजवळील मेहकरजवळ लघुशंकेसाठी तीन प्रवाशी थांबले होते. यावेळी भरधाव वेगात येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. विजय मंटे (रा. दिग्रस) असं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. अपघातग्रस्त व्यक्ती हे वाशिमहून बीडकडे निघाले होते. (Maharashtra Political News)
धुळ्याहून नागपूरकडे जाणाऱ्या कारचा अपघात
शनिवारी समृद्धी महामार्गावर दुसरा अपघात बुलढाण्यातील (Buldhana) मेहकरजवळ झाला. भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने कार अचानक उलटली. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर तिघे जखमी झाले. जखमींवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघाग्रस्त हे धुळ्याहून नागपूरच्या दिशेने जात होते.
दरम्यान, समृद्धी महामार्गावरील तिसऱ्या अपघातात, एका ट्रकचालकाचा मृत्यू झाला. भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकचालकाला अचानक डुलकी लागल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. काही कळण्याच्या आत ट्रक बेरिअर महामार्गाच्या कडेला जाऊन उलटला. या अपघातात ट्रकचालक दिनेशकुमार तिवारी (रा. आझमगड) जागीच ठार झाला.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.