Breaking : प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा निर्णय ! 'या' जुन्या वाहनांवर बंदी SaamTV
देश विदेश

Breaking : प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा निर्णय ! 'या' जुन्या वाहनांवर बंदी

बांधकाम, वाहतूक, पॉवर प्लांटवर बंदी, Work from Home जाहीर करणे या सारख्या सूचना दिल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संतोष शाळीग्राम -

नवी दिल्ली : दिल्ली आणि NCR म्हणजेच राष्ट्री़य राजधानी क्षेत्रामध्ये वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण (Pollution control) आणण्यासाठी दिल्ली सरकारच्या वतीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार येत्या काही दिवसांसाठी दिल्लीमधील बांधकाम व्यवसायही बंद राहणार आहेत. तसेच अत्यावश्यक सेवांमधले ट्रक वगळता, सर्व ट्रकला 21 नोव्हेंबपर्यंत दिल्लीत प्रवेश बंद करण्यात आला आहे. शिवाय15 वर्षांपेक्षा जुनी पेट्रोल वाहने आणि 10 वर्षांपेक्षा जुनी डिझेल वाहनांवर बंदी घालण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. (Big decision for pollution control Ban on old vehicles)

हवेची गुणवत्ता 21 नोव्हेंबरपर्यंत 'अत्यंत खराब'

दिल्लीतील वाढते प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी दिल्ली सरकारने (Government of Delhi) अनेक उपाययोजना केल्या असून त्याबाबतचा अहवाल त्यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केली आहे. तसेच कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंटच्या (Commission for Air Quality Management) बैठकीत येत्या काही दिवसांत प्रदूषणावर नियंत्रण ठेवता येईल, अशा उपाययोजनांची यादी तयार करण्यात आली आहे. जाहीर केलेल्या निर्देशात आयोगाने हवामान खात्याच्या अंदाजाचा हवाला देत म्हटले की दिल्ली-NCR मधील हवेची गुणवत्ता किमान 21 नोव्हेंबरपर्यंत 'अत्यंत खराब' स्थितीत राहू शकते.

जुन्या वाहनांवर बंदी -

बांधकाम, वाहतूक, पॉवर प्लांटवर बंदी, वर्क फ्रॉम होम जाहीर करणे या सारख्या सूचना दिल्या आहेत. या उपाययोजनांची यादी बुधवारी पर्यावरण मंत्रालयने (Ministry of Environment) सर्वोच्च न्यायालयासमोर (Supreme Court) सादर केली. यामध्ये 15 वर्षांपेक्षा जुनी पेट्रोल वाहने आणि 10 वर्षांपेक्षा जुनी डिझेल वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. दिल्ली आणि राजधानीला लागून असलेल्या उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, पंजाब (UP, Haryana, Rajasthan, Punjab) या राज्यांतील जिल्ह्यांनाही ही सूचना जारी करण्यात आली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Swiggy CEO networth : स्विगीचे सीईओंचं शिक्षण आणि नेटवर्थ किती?

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

SCROLL FOR NEXT