भंडारा : लठ्ठपनाचा फायदा घेत कार चालकांना लिफ्ट मागुन, रस्त्यात त्यांना गूँगीचे औषध देत बेशुद्ध करुन त्यांची कार चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या 3 आरोपींना भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (Bhandara Local Crime Branch Squad) अटक केली आहे. पुष्पेंद्र उर्फ गब्बर मितजयसिंग चालुक्य वय 42, सतबीरसिंह निन्दरसिंग शेरगिल वय 36, भास्कर नंदेश्वर वय 52 असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीची एर्टिगा कार (Ertiga car) आणि 127 झोपेच्या गोळ्या (Sleeping pills) जप्त केल्या आहेत.
हे देखील पहा -
घटनेच्या दिवशी 9 नोव्हेंबर रोजी भंडारा जिल्ह्याच्या आंधळगाव येथील कैलास तांडेकर यांना आरोपी भास्कर याने आपल्या लठ्ठपणाचा फायदा घेत लिफ्ट मागितली. दरम्यान काही वेळ त्यांच्यासोबत प्रवास करत कैलास यांनी आरोपीने बेशुद्ध केले आणि ज्या गाडीला लिफ्ट मागितली ती एर्टिगा कार पळवळून घेऊन गेला.
दरम्यान काही वेळाने शुद्धीवरती आल्यानंतर गाडीमालकांना त्यांच्याबरोबर झालेल्या फसवाफसवीचा अंदाज आला आणि त्यांनी हा सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. तुमसर पोलिसांनी (Tumsar police) याबातची तक्रार दाखल होताच या घटनेचा तपास पोलिस अधीक्षकांनी भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिला. त्या आधारे तपास सुरु असतांना छत्तिसगड दुर्ग येथे खबऱ्यामार्फत संबधित कार विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत आरोपी दुर्ग च्या सिविल लाइन परिसरात आरोपी पुष्पेंद्र उर्फ गब्बर मितजयसिंग चालुक्य व सतबीरसिंह निन्दरसिंग शेरगिल यांना भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.
आरोपींच्या कबूली जवाबावरून आरोपी भास्कर नंदेश्वर यास अटक केली असून तसेच या प्रकरणात वाहनचालकाला बेशुद्ध करण्यासाठी वापरलेल्या जवळपास 127 झोपेच्या गोळ्या व बिस्किट आणि पळवलेली कार पोलिसांना आरोपीकडून जप्त केली आहेत. दरम्यान या टोळीने अजून कोणत्या गाड्या चोरी केल्या आहेतका याचा तपास पोलिस करत आहेत.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.