bharat ratna Award Process  Saam tv
देश विदेश

Bharat Ratna Award Process: भारतरत्न देण्याची प्रक्रिया काय असते? पुरस्कारप्राप्त व्यक्तींना कोणत्या नियमांचं पालन करावं लागतं?

Know about bharat ratna Award Process in Marathi: भारतातील हा सर्वोच्च पुरस्कार देण्याची प्रक्रिया काय असते, या पुरस्कारप्राप्त व्यक्तींना कोणत्या नियमांचं पालन करावं लागतं? जाणून घेऊयात.

Vishal Gangurde

Bharat ratna Award :

मोदी सरकारने २३ जानेवारीला बिहारचे माजी मुख्यमत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर ११ दिवसांनी भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचे जाहीर करण्यात आले. भारतातील हा सर्वोच्च पुरस्कार देण्याची प्रक्रिया काय असते, या पुरस्कारप्राप्त व्यक्तींना कोणत्या नियमांचं पालन करावं लागतं? जाणून घेऊयात. (Latest Marathi News)

भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. देशातील हा सर्वोच्च पुरस्कार हा कोणत्याही जाती, धर्म, लिंग , व्यवसाय किंवा कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीला दिला जातो. तसेच यात कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा आणि क्रीडा याचा सामावेश आहे. हा पुरस्कार देण्याची सुरुवात २ जानेवारी १९५४ या दिवसापासून सुरु झाली. पहिला भारतरत्न पुरस्कार हा देशाचे पहिले गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना मिळाला. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारतरत्न पुरस्कार देण्याची प्रक्रिया काय असते?

भारतरत्न पुरस्कार कोणत्याही व्यक्तीला देण्याची शिफारस भारताचे पंतप्रधान करु शकतात. या व्यतिरिक्त मंत्रिमंडळाचे सदस्य, राज्यपाल आणि मुख्यमंत्री शिफारस करु शकतात. या शिफारशीनंतर पंतप्रधान कार्यालयात चर्चा होते. त्यानंतर राष्ट्रपतींच्या अंतिम मंजुरीची वाट पाहावी लागते.

राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर भारतरत्न पुरस्कार दिला जातो. दरवर्षी जास्तीत जास्त भारतरत्न दिला जातो. प्रत्येकवर्षी भारतरत्न पुरस्कार देणेही अनिवार्य नाही. काही व्यक्तींना त्यांच्या जीवनकाळात आणि तर काही जणांना मरणोत्तर पुरस्कार देखील दिला जातो.

भारतरत्न पुरस्कारप्राप्त देशासाठी VIP

भारतरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्ती हा देशासाठी VIP असते. भारतरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्तीला सरकारच्या अनेक सुविधा मिळतात. त्यांना रेल्वेचा प्रवास मोफत असतो. तसेच ते सरकारचे प्रमुख पाहुणे असतात. त्याचबरोबर महत्वाच्या शासकीय कार्यक्रमाचंही निमंत्रण मिळतं. त्यांना प्रोटोकॉलनुसार, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान, राज्यपाल, माजी राष्ट्रपती, मुख्य न्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री , माजी पंतप्रधान, लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी पक्ष नेत्यानंतर स्थान दिलं जातं.

भारतरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्ती नाव कोणत्या पद्धतीने लिहू शकतो?

संविधानाच्या अनुच्छेद १८(१) अनुसार, भारतरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्ती पुरस्काराचं नाव थेट नावाच्या पुढे किंवा मागे लावू शकत नाही. पुरस्कार मिळाला हे दर्शविण्यासाठी ही व्यक्ती इतर पद्धतीने नाव लिहू शकते. 'राष्ट्रपतीद्वारे भारतरत्न पुरस्कारने सन्मानित' किंवा 'भारतरत्न पुरस्कारप्राप्त' अशा पद्धतीने व्यक्ती लिहू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : दादर माहिममध्ये महेश सावंत आघाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT