लालकृष्ण अडवाणी यांना नुकताच केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असून राजकारण, कला, साहित्य आणि विज्ञान, शास्त्रज्ञ, उद्योगपती, लेखक आणि समाजसेवा या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. जिवंतपणी किंवा मरानोत्तर हा पुरस्कार दिला जातो. लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर अनेकांच्या मनात कुतूहल असेलच की देशाचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीला कोणत्या सुविधा मिळतात. आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत.
‘व्हीव्हीआयपी’च्या समकक्ष श्रेणी
संसदेच्या बैठका व सत्रांमध्ये सहभागी होण्याची सवलत
प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन समारंभात सन्माननीय अतिथी म्हणून मान
भारतामध्ये कुठेही प्रवास करण्यासाठी प्रथम श्रेणीचे मोफत विमान व रेल्वे प्रवास तिकिट.
भारताच्या पंतप्रधानांच्या वेतनाएवढे किंवा त्याच्या ५० टक्के इतके निवृत्ती वेतन.
आवश्यकतेनुसार ‘झेड’ श्रेणीची सुविधा.
माजी पंतप्रधान, केंद्र सरकारमधील कॅबिनेट स्तराचे मंत्री, लोकसभा व राज्यसभेतील प्रमुख विरोधी पक्षनेता, भारतीय योजना आयोगाचे डेप्युटी चेरमन आणि राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या नंतरच्या सातव्या स्थानाच्या दर्जाचा सन्मान ‘भारतरत्न’ विजेत्या व्यक्तीला दिलेला आहे.
'भारतरत्न' पुरस्काराने गौरव करताना भारत सरकारकडून प्रमाणपत्र पदक देण्यात येतं. या पुरस्कारासोबत पैसे दिले जात नाहीत. मेडलवर तांब्यापासून बनलेलं पिंपळाचं पान असतं आणि या पानात प्लॅटिनम पासून बनलेला सूर्य असतो. पानाच्या शिराही प्लॅटिनमच्या असतात. या पानाखाली हिंदीमध्ये चांदीने भारतरत्न लिहिलेलं असतं. मेडलच्या मागच्या बाजूला अशोक स्तंभ असून त्याच्या खाली 'सत्यमेव जयते' लिहिलेलं असतं.
स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी, माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमण हे या पुरस्काराचे पहिले मानकरी होते. त्यांनातत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते 1954 रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. 1954 पर्यंत केवळ हयात असलेल्या व्यक्तींना उल्लेखनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार प्रदान केला जात होता. मात्र 1955 मध्ये त्यामध्ये बदल करून मरणोत्तर 'भारतरत्न' देण्याची तरतूद करण्यात आली. दरवर्षी 26 जानेवारीला हा पुरस्कार प्रदान केला जातो.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.