पाकिस्तानची सार्वत्रिक निवडणूक चार दिवसांवर आलेली असताना देशात विविध भागात दहशतवादी हल्ले होत आहेत. निवडणूक आयोगाने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला असला तरी निवडणूक प्रक्रियेत अडथळे आणले जात आहेत. निवडणूक जाहीर झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये सातत्याने बॉम्बस्फोट आणि ग्रेनेड हल्ले होत आहेत. अन्य एका घटनेत न्यू कराची भागात प्रचारादरम्यान दोन गटात झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला.(Latest News)
ग्रेनेड हल्ल्यांची घटना ताजीच असताना शुक्रवारी रात्री शहरातील पाकिस्तान निवडणुक आयोगाच्या (इपीसी) कार्यालयाबाहेर स्फोट झाला. प्रांतीय कार्यालयाच्या वाहनतळात आयईडी स्फोटकाने भरलेली बॅग कचराकुंडीत फेकल्यानंतर स्फोट झाला. मात्र या स्फोटात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आयईडी स्फोटकाने भरलेली बॅग पाकिस्तान निवडणूक आयोगाच्या प्रांतीय मुख्यालयाच्या वाहनतळात ठेवली होती. बॅगमध्ये टायमरसह एक आयईडी ठेवण्यात आला होता. रात्री ९ ते १० वाजता स्फोट होईल असा टाईम सेट करण्यात आला होता. मात्र वाहनतळात साफसफाई करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने ती बॅग पाहिली आणि त्यास इमारतीबाहेरच्या कचराकुंडीत फेकली.
बॅग फेकताच लहान स्फोट झाला आणि मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी सय्यद असद रजा म्हणाले आहे. हल्लेखोरांचे लक्ष्य निवडणूक आयोगाचे कार्यालय होते. हा बॉम्ब वाहनतळात फुटला असता तर मोठे नुकसान झाले असते.
खैबर पख्तुनख्वाव्यतिरिक्त कराची, क्वेट्टा, सिंध, बलुचिस्तान प्रांताच्या अन्य भागात निवडणुकीसंबंधी हिंसाचाराच्या घटनेचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाने नुकतीच आपत्कालीन बैठक बोलावली होती. त्यानंतर निवडणुकीच्या काळात बंदोबस्तात वाढ करण्याचे ठरविले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.