Shreya Maskar
घोसाळगड हा किल्ला वीरगड या नावाने देखील ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकल्यानंतर त्याचे नाव बदलून वीरगड ठेवले होते.
वीरगड हा एक गिरीदुर्ग आहे. या किल्ल्यावरून रायगडचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. त्यामुळे येथे आवर्जून जा.
वीरगड किल्ला हा रायगड जिल्ह्यातील रोहा जवळील आहे. त्यामुळे तुम्ही येथे वन डे पिकनिक प्लान देखील करू शकता.
घोसाळगड किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 260 मीटर उंचीवर आहे. हा किल्ला एका टेकडीवर वसलेला आहे. तुम्ही येथे फोटोशूट देखील करू शकता.
घोसाळगड ट्रेकिंगसाठी एक उत्तम पर्याय आहे. तसेच हा किल्ला सोपा ट्रेकिंग स्पॉट आहे. तुम्ही येथे हिवाळ्यात भेट देऊ शकता.
घोसाळगड किल्ला व्यापारी मार्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बांधला गेला होता. शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी घोसाळगड किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे.
घोसाळगड किल्ल्याला जाण्यासाठी रोहा हे जवळचे रेल्वे स्थानक आहे. घोसाळगड किल्ला रेवदंडा आणि साळवे या दोन खाड्यांच्या मध्ये एका छोट्या टेकडीवर वसलेला आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.