Bharat Ratna to karpoori thakur: मोदी सरकारची मोठी घोषणा, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न मिळणार

Bharat Ratna to karpoori thakur: मोदी सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रपती भवनाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
karpoori thakur
karpoori thakurSaam tv
Published On

karpoori thakur :

मोदी सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रपती भवनाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं की, 'भारत सरकारला सांगताना अभिमान वाटत आहे की, देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार दिवंगत कर्पूरी ठाकूर यांना देण्यात येत आहे. ठाकूर हे भारतीय राजकारणातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. समाजातील वंचित घटकांच्या प्रगतीसाठी कर्पूरी ठाकूर यांनी आयुष्यभर योगदान दिलं'.

karpoori thakur
Loksabha Election: देशात १६ एप्रिलला लोकसभा निवडणूक होणार? काय आहे निवडणूक आयोगाच्या पत्राचं सत्य?

कर्पूरी ठाकूर यांचं बुधवारी १०० वी जयंती होणार आहे. त्याआधीच त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. जनता दल यूनाइटेड पक्षाने कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. या घोषणेनंतर जनता दल यूनाइटेडने मोदी सरकारचे आभार मानले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

karpoori thakur
Republic Day Special: शत्रूला भनकही न लागता 'टायगर शार्क' करणार काम तमाम; 26 जानेवारीला दाखवणार ताकद, मुंबईचं आहे कनेक्शन

३६ वर्षांच्या मेहनतीला यश

कर्पूरी ठाकूर यांचे पूत्र रामनाथ ठाकूर यांनी म्हटलं की, गेल्या ३६ वर्षांच्या मेहनतीचं यश मिळालं आहे. मी माझं कुटुंब आणि १५ कोटी लोकांकडून सरकारला आभार व्यक्त करतो'.

karpoori thakur
Bharat Jodo Nyay Yatra:'आम्ही बॅरिकेड्स तोडले, पण कायदा मोडणार नाही' : राहुल गांधी

कोण आहेत कर्पूरी ठाकूर?

कर्पूरी ठाकूर यांचा जन्म बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील पितौझिया गावात जन्म झाला. पाटणात १९४० साली मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला. कर्पूरी ठाकूर यांनी समाजवादाचा मार्ग निवडला. त्यांनी १९४२ साली महात्मा गांधी यांनी सुरु केलेल्या चळवळीतही सहभाग नोंदवला. त्यामुळे त्यांना तुरुंगातही जावं लागलं.

१९४५ साली तुरुंगातून बाहेर आल्यानंतर कर्पूरी ठाकूर हे समाजवादी आंदोलनाचे आश्वासक चेहरा झाले. पुढे त्यांनी समाजातील विषमताही दूर करण्यासही मोलाचा हातभार लावला. मागासवर्गीय, वंचित समाजातील लोकांसाठी त्यांनी काम केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com