सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक रॅपिडो बाईकचालक महिला प्रवासीच्या कानशिलात लगावत असल्याचे पाहायला मिळते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रॅपिडो बाईकचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. रॅपिडो चालक सुहासने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. महिलेने प्रथम मला मारले होते, माझ्यावर हल्ला केला होता. त्यानंतर मी स्वसंरक्षणार्थ प्रतिक्रिया दिली, असे सुहासने म्हटले आहे.
रॅपिडो ड्रायव्हर सुहासने काय म्हटले?
सुहास म्हणाला, मी त्या दिवशी सकाळी ९ वाजता त्या महिलेला घराबाहेरुन पिकअप केले होते. राईड सुरु झाल्यानंतर मला घाईत ऑफिसला पोहोचायचे आहे असे तिने मला सांगितले. तिला ऑफिसला जायला उशीर होऊ नये यासाठी मी तिला जयनगरपासून एका छोट्या रस्त्याने घेऊन जात होतो. त्याच दरम्यान एक कार आमच्यासमोर आली आणि मला अचानक ब्रेक दाबून बाईक थांबवावी लागली.
आम्ही तिच्या ऑफिसपासून १०० मीटर लांब होते. बाईक थांबवल्यानंतर तिने मला ओरडण्यास सुरुवात केली. तुझं शिक्षण किती झालंय? तुला बाईक कशी चालवायची हे माहीत आहे का? असे म्हणत तिने ओरडू लागली. तुम्हाला घाई असल्याने शॉर्टकट घेतला हे मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण तिने मला बोलूच दिले नाही.
रागाच्या भरात 'तू तुझ्या राज्यात परत जा', असे ती म्हणाली. राईडचे ७७ रुपये द्यावे लागतील असे मी म्हटले. त्यावरही ती सतत ओरडू लागली. मग तिने माझ्यावर हात उचलला. तिने टिफिन बॉक्सने देखील माझ्यावर हल्ला केला. मी शांत राहण्याचा प्रयत्न केला. पण तिने दोनदा कानशिलात मारल्यानंतर मी स्वसंरक्षणार्थ प्रतिक्रिया दिली. तेथे जमलेल्या लोकांना मी परिस्थिती समजावून सांगितली.
रॅपिडो चालकाने महिलेच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायल झाला. त्यानंतर पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सोमवारी (१६ जून) महिला जयनगर पोलीस ठाण्यात हजर झाली. तिने चालकाच्या विरोधात तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलिसांनी रॅपिडो चालक सुहासला ताब्यात घेतले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.