Couple Romance Yandex
देश विदेश

Shocking News: नुकतंच लग्न झालेलं जोडपं खिडकी उघडी ठेवून ठेवायचे शरीरसंबंध; शेजारणीनं थेट पोलीस ठाणं गाठलं

Neighbours Fight: बेंगळुरूमध्ये एका महिलेने आपल्या शेजाऱ्यांविषयी एक विचित्र तक्रार केली आहे. खिडकी उघडी ठेवून जोडप्याने शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल शेजारणीने थेट पोलीस ठाण्यातच धाव घेतली आहे.

Rohini Gudaghe

Bengaluru News Neighbours Fight

दक्षिण बेंगळुरूमधील गिरिनगर येथील अवलाहल्ली येथील एका ४४ वर्षीय महिलेने तिच्या शेजाऱ्यांची तक्रार पोलिसांमध्ये केली आहे. शेजाऱ्यांनी खिडकी उघडी ठेवून शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल शेजारणीने थेट पोलीस ठाण्यातच (Bengaluru Crime) धाव घेतली आहे. तिने या जोडप्याविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती टाईम्स ऑफ इंडियाच्या हवाल्यानुसार मिळत आहे.  (Latest Crime News)

या जोडप्याचं नुकतंच लग्न झालेलं आहे. या दाम्पत्याच्या घरमालकाच्या पत्नीने देखील त्या महिलेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भाडेकरूंनी घर सोडून जावं म्हणून ती महिला त्रास देत असल्याचं या जोडप्याच्या घरमालकीनीने म्हटलं (Fight Over Open Window Physical Relation) आहे. आता पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूने तक्रार दाखल झालेली आहे. हे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचं असल्याचं पाहायला मिळतंय.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या दोन्ही पक्षांनी गिरीनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. दोन्ही तक्रांरीवरून एफआयआर नोंदविण्यात आली आहे. ८ मार्च रोजी शेजारच्या महिलेनं खिडकी उघडी ठेवून या जोडप्याने शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार केली (Bengaluru News Neighbours Fight) होती. तिने सांगितलं की, तीने रात्री साडेदहाच्या सुमारास घराचा दरवाजा उघडला असता तिला हे जोडपं विचित्र कारनामा करत असल्याचं दिसलं. हे दृश्य अतिशय घृणास्पद असल्याचं तिने म्हटलं आहे. जेव्हा तिने या जोडप्याला खिडकी बंद करायला सांगितली, तेव्हा त्यांनी या महिलेला शिवीहाळ केली. जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप या महिलेने केला आहे.

याला प्रत्युत्तर म्हणून या जोडप्याच्याघरमालकाच्या पत्नीने 10 मार्च रोजी उलट तक्रार दाखल केली. ही महिला तिच्या भाडेकरूंसोबत जाणूनबुजून भांडण करत असल्याचा आरोप तिने केला (Neighbours Fight News) आहे. नवविवाहित जोडपं आणि त्याच्या घरमालकाच्या पत्नीने या महिलेवर भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

अनेकदा चित्रपटांमध्ये दोन शेजारी खिडकीमधून एकमेकांच्या आयुष्यात डोकावताना दिसतात. पण, खऱ्या आयुष्यात एकमेकांच्या खिडकीमध्ये डोकावणं खूप महागात पडलं (Shocking News) आहे.बेंगळुरुमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ही घटना ऐकून 1968 सालचा बॉलीवूड कॉमेडी 'पडोसन'मधील 'मेरे सामने वाली खिडकी पे...' हे गाणं आठवत आहे. सध्या हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे. नुकतंच लग्न झालेल्या जोडप्याने खिडकी उघडी ठेवून शरीरसंबंध ठेवले अन् शेजारीण थेट पोलीस ठाण्यात पोहोचल्याची घटना बेंगळुरूमध्ये घडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rush Driving: रस्त्यावर वाहन चालवताना 'या' चुका केल्या तर नाही मिळणार विमा: सुप्रीम कोर्ट

Shocking: वॉशरूमध्ये लपून महिला सहकाऱ्यांचे VIDEO काढायचा, इन्फोसिसच्या इंजिनीअरला अटक

Nails Cutting Tips: नखं कापण्यासाठी योग्य दिवस कोणता?

कन्नड नगरपरिषदेची जुनी इमारत पत्त्यासारखी कोसळली, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दुर्घटना; थरारक VIDEO

Nashik News: देव्हाऱ्याखाली दारूचा साठा सापडला, दृश्य बघून पोलिसही चक्रावले | VIDEO

SCROLL FOR NEXT