Shruti Vilas Kadam
८०च्या दशकातील फॅशनमध्ये मोठ्या आणि उठावदार प्रिंट्सना विशेष महत्त्व होते. फ्लोरल, जिओमेट्रिक किंवा अॅब्स्ट्रॅक्ट प्रिंट असलेले शर्ट आजही रेट्रो लूकसाठी उत्तम पर्याय आहेत.
सैल आणि आरामदायी फिटिंगचे शर्ट ८०s फॅशनची खासियत होते. जीन्स किंवा ट्राउझर्ससोबत ओव्हरसाइज शर्ट घालून सहज कॅज्युअल आणि स्टायलिश रेट्रो लूक मिळवता येतो.
रंगीत किंवा कॉन्ट्रास्ट स्ट्राइप्स असलेले शर्ट ८०च्या दशकातील फॅशनमध्ये लोकप्रिय होते. उभ्या किंवा आडव्या पट्ट्यांचा शर्ट साध्या पँटसोबतही आकर्षक दिसतो.
डेनिम शर्ट हा रेट्रो फॅशनचा कायम लोकप्रिय भाग आहे. डेनिम शर्टसोबत डेनिम जीन्स किंवा कॉन्ट्रास्ट ट्राउझर्स घालून कूल 80s स्टाइल तयार करता येते.
मोठ्या फ्लोरल प्रिंटचे रंगीत शर्ट रेट्रो वाइब देतात. बीच आउटिंग, पार्टी किंवा कॅज्युअल लूकसाठी अशा प्रकारचे शर्ट आजही आकर्षक पर्याय ठरू शकतात.
शर्टच्या कॉलरला वेगळा रंग किंवा डिझाइन देण्याची स्टाइल ८०च्या दशकात लोकप्रिय होती. साध्या पँटसोबत असा शर्ट घातल्यास लूकमध्ये लगेच रेट्रो टच येतो.
पिवळा, लाल, निळा, हिरवा किंवा पिंकसारखे ब्राइट रंग 80s फॅशनमध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत. आजच्या रेट्रो-थीम पार्टीसाठी असे शर्ट परफेक्ट ठरू शकतात.