गाडी खराब झाली अन् त्याचवेळी काळाचा घाला! 18 जणांचा मृत्यू, 19 जखमी Saam Tv
देश विदेश

गाडी खराब झाली अन् त्याचवेळी काळाचा घाला! 18 जणांचा मृत्यू, 19 जखमी

19 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती यूपी पोलिस अधिकाऱ्यांनी दिली असून, जखमी प्रवाशांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वृत्तसंस्था

उत्तर प्रदेश: लखनौ-अयोध्या राष्ट्रीय महामार्गावर (lucknow ayodhya expressway), दुहेरी-डेकर बसला भरधाव ट्रकने धडक दिल्याने उत्तर प्रदेशमधील (UP Barabanki Accident) बाराबंकी येथे झालेल्या मोठ्या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यातील राम सनेही घाट पोलिस स्टेशनजवळ ही घटना घडली आहे. मंगळवार आणि बुधवारी मध्यरात्री पहाटे दीडच्या सुमारास ही घटना घडली, अशी माहिती माध्यामांनी दिली आहे. या घटनेत 19 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती यूपी पोलिस अधिकाऱ्यांनी दिली असून, जखमी प्रवाशांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रुग्णालयात पत्रकारांशी बोलताना लखनऊ झोनचे एडीजी सत्य नारायण साबात यांनी पुष्टी केली की बाराबंकी जिल्ह्यातील राम सनेही घाट जवळील महामार्गावर काल रात्री झालेल्या या भीषण दुर्घटनेत तब्बल 18 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही अनेकजण बसखाली अडकले आहेत, असे ते म्हणाले, सध्या बचावकार्य सुरू आहे. "सीतामढी आणि सहरसा सह बिहारमधील जिल्ह्यातील बहुतांश प्रवासी होते," असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. "ते पंजाब आणि हरियाणा येथून आपल्या मूळ राज्यात परत जात होते".

बाराबंकी अपघाताची माहिती देताना एडीजी सत्य नारायण साबत म्हणाले, अॅक्सल शाफ्ट खाली पडल्याची माहिती ड्रायव्हरने प्रवाशांना दिली असता अनेक प्रवासी बसमधून बाहेर पडले. काही क्षणानंतर, एका वेगवान ट्रकने मागून बसला जोरदार धडक दिली. यामुळे महामार्गावर आराम करणाऱ्या अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला; तर अनेक गंभीर जखमी झाले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT