July 2023 Bank Holiday: जून महिना (July 2023) संपायला आता अवघे तीनच दिवस शिल्लक आहेत. लवकरच जुलै महिना सुरु होणार आहे. नवीन महिना सुरु होण्यासोबतच अनेक बदल देखील होतात. जुलै महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) जुलै 2023 मध्ये बँकांच्या सुट्ट्यांची यादी जारी केली आहे. (Latest Marathi News)
जुलै महिन्यामध्ये 15 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे अर्धा महिना बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. जर तुम्हाला बँकेच्या सुट्ट्यांची तारीख माहिती असेल तर तुम्हाला बँकेशीसंबंधीत काम मार्गी लावण्यासाठी नियोजन करता येते. जर तुम्हाला बँकेच्या सुट्ट्यांची यादी माहिती नसेल तर तुमची ही कामं रखडतात आणि तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे जुलै महिन्यात बँका कोणत्या दिवशी बंद राहणार हे जाणून घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या सुट्ट्या प्रदेशानुसार बदलू शकतात. जुलै महिन्यात बँकांना 15 सुट्ट्या आहेत. पण याचा अर्थ असा नाही की सर्व शाखांना १५ दिवस सुट्टी असेल. दरम्यान, बँका जरी बंद असल्या तरी देखील तुम्ही ऑनलाइन पद्धतीने हे व्यवहार करु शकता.
बँकेच्या सुट्टीच्या दिवशी कोणतेही तातडीचे काम असल्यास तुम्ही एटीएम, इंटरनेट बँकिंग, नेट बँकिंग आणि इतर सेवांचा वापर करु शकता. तसंच एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तुम्ही UPI वापरू शकता. यासोबतच तुम्ही क्रेडिट, डेबिट कार्डचा देखील सहज वापर करु शकता.
5 जुलै (बुधवार) - गुरु हरगोविंद जयंती - जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद
6 जुलै (गुरुवार) - MHIP दिवस - मिझोरममध्ये बँका बंद
11 जुलै (मंगळवार) – केर पूजा – त्रिपुरामध्ये बँका बंद
13 जुलै (गुरुवार) - भानू जयंती - सिक्कीममध्ये बँका बंद
17 जुलै (सोमवार) – यू तिरोट सिंग डे – मेघालयमध्ये बँका बंद
21 जुलै (शुक्रवार) - द्रुक्पा त्शे-जी - सिक्कीममध्ये बँका बंद
२८ जुलै (शुक्रवार) – आशुरा – जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद
29 जुलै (शनिवार) - मोहरम (ताजिया) - त्रिपुरा, मिझोरम, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, यूपी, बंगाल, नवी दिल्ली, बिहार, झारखंड, एचपीमध्ये बँका बंद
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.