Mumbai News: मुंबई तुंबणारच, मुंबईकरांना सवय करून घ्यावी लागणार; बीएमसी माजी आयुक्तांची स्पष्टोक्ती

Mumbai News: पाणी भरलं की अनेक नागरिक थेट बीएमसीच्या नावाने खडे फोडतात.
Mumbai News
Mumbai NewsSaam TV
Published On

Mumbai Rain: यंदा पावसाने मुंबईत उशिरा हजेरी लावली. मात्र पहिल्याच दिवशी पाऊस असा काय बरसला की, संपूर्ण मुंबईची तुंबई झाली. अनेक सखल भागात पाणी साचले. त्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. पाणी भरलं की अनेक नागरिक थेट बीएमसीच्या नावाने खडे फोडतात. मात्र मुंबई तुंबण्याची कारणे वेगळीच आहेत, असं बीएमसी माजी आयुक्त डॉ. जयराज फाटक यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

प्रत्येक पावसाळ्यात (Rain) मुंबईत पूर येतच राहणार आहे आणि दरवर्षी मुंबई तुंबणार आहे. असं फाटक यांनी स्पष्ट सांगितलं आहे. डॉ. जयराज फाटक यांनी मुंबईकरांच्या पूराच्या समस्येवर पुढे म्हटलं आहे की, "राजकारणी व्यक्ती नेहमीच मुंबईत पूरस्थिती येणार नाही असा दावा करतात. मात्र त्यांचा हा दावा मी फेटाळून लावतो. मुंबईतील भूभागामुळे येथे कायम पूर येईल हे नागरिकांनी स्वीकारले पाहिजे कारण बहुतेक शहर भरतीच्या पातळीच्या खाली वसलेली आहेत." मिड डे या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना बीएमसी माजी आयुक्त डॉ. जयराज फाटक यांनी या विषयावर माहिती दिली आहे.

Mumbai News
Nanded Crime News: नांदेडमध्ये घरफोड्या करणाऱ्या चड्डी गँगची दहशत; चोरीचा पॅटर्न पाहून पोलिसही चक्रावले

पूर येण्याचं खरं कारण काय?

पावसाळा सुरु होण्याआधी बीएमसीकडून सर्वत्र नालेसफाईची कामे केली जातात. त्यांनी ही कामे नीट केली नाहीत त्यामुळे मुंबई तुंबली असा नाराजीचा सूर नागरिकांमध्ये पाहायला मिळतो. "मात्र शहराचा भूगोल आणि पावसाच्या बदलत्या स्वरूपामुळे मुंबईला पूर येतच राहणार आहे. हे नागरिकांनी स्वीकारले पाहिजे. सर्व नागरी कामे थांबवणे आणि वर्षातून फक्त 3-4 महिने येणार्‍या पुराच्या समस्येला तोंड देण्यासाठी आर्थिक लक्ष केंद्रित करणे शक्य नाही.", असं डॉ.जयराज फाटक यांनी म्हटलं आहे.

“शहरातील बहुतेक भाग भरती रेषेखाली आहेत. अशा शहरात काही केले तरी पाणी साचने टाळूता येत नाही. पावसाचे सर्व पाणी मुंबईतून समुद्रात वाहून जाते. भरती-ओहोटीच्यावेळी हे पाणी समुद्रातच थांबते असे नाही. पाण्याला बाहेर निघण्यास जागा नसल्याने पाणी थेट शहरांमध्ये शिरते. जर एका दिवसातील सरासरी वार्षिक पावसाच्या 10 टक्के पाऊस एखाद्या शहरात पडला तर केवळ मुंबईच (Mumbai) नाही तर इतर कोणत्याही शहरात पाणी साचते, असं स्पष्टीकरण फाटकांनी दिलं आहे.

Mumbai News
Karnataka Crime News: मित्रानेच केला मित्राचा घात! जंगलात नेऊन मित्रासोबत केलं भयानक कृत्य, आधी गळा चिरला नंतर...

नाले सफाईवर पूर परिस्थिती अवलंबून नाही

“नाले स्वच्छ असतील तर शहरात पाणी (Water) साचणार नाही, असे म्हणणे गैर आहे. पूर्वी मातीचे बांधकाम असायचे. मात्र आता सर्वत्र सिमेंटची बांधकामे आहेत. त्यामुळे पाणी आतमध्ये झिरपत नाही.", असंही बीएमसी माजी आयुक्त डॉ. जयराज फाटक यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com