ATM मधील रोख रक्कम संपली तर बँकांनाच दंड; RBI चा नवीन नियम  Saam Tv
देश विदेश

ATM मधील रोख रक्कम संपली तर बँकांनाच दंड; RBI चा नवीन नियम

ATM मध्ये जर पैसे नसतील तर संबंधित बँकेला दहा हजार रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे. RBI ने मंगळवारी ही घोषणा केली.

वृत्तसंस्था

RBI: एटीएम मशिनमध्ये ATM Machine पैसे नसतील तर बँकेच्या ग्राहकांना बँकेतून पैसे काढताना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. पण आता यावर नियंत्रण येणार आहे. ATM मध्ये जर पैसे नसतील तर संबंधित बँकेला दहा हजार Ten Thousand रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे. RBI ने मंगळवारी ही घोषणा केली.

हे देखील पहा-

भारतीय रिझर्व्ह बँकेने RBI एटीएममध्ये रोकड संपल्यामुळे बँकांना दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा नवीन नियम येत्या 1 ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार आहे. एटीएममध्ये ATM रोख रक्कम उपलब्ध न झाल्याने लोकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी मध्यवर्ती बँकेने हे पाऊल उचलले आहे. एटीएममध्ये वेळेवर पैसे जमा न करणाऱ्या संबंधित बँकेवर 10,000 रुपये दंड आकारला जाईल.

कोणत्याही एका महिन्यात 10 तासांपेक्षा जास्त काळ एटीएममध्ये (Automated teller machine) रोख रक्कम न ठेवल्यास आरबीआय हा दंड संबंधित बँकांना Banks लावेल. मध्यवर्ती बँकेने एका परिपत्रकात म्हटले आहे की, "एटीएममध्ये रोख रक्कम न पाठवल्याबद्दल दंड आकारण्याचा हेतू हे आहे की लोकांच्या सोयीसाठी या मशीनमध्ये पुरेसा निधी उपलब्ध आहे. " यासाठी Scheme of Penalty for non-replenishment of ATMs' या नियमाची घोषणा RBI कडून करण्यात आली आहे.

व्हाईट लेबल एटीएमच्या बाबतीत, संबंधित ATM मध्ये रोकड वितरीत करणाऱ्या बँकेवर दंड आकारला जाईल. व्हाईट लेबल एटीएम बँक-नसलेल्या संस्थांद्वारे चालवले जातात. व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटरकडून Operator बँक दंडाची रक्कम वसूल करू शकते.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

SCROLL FOR NEXT