किन्नौर: हायवेवर कोसळली दरड; प्रवाश्यांसह बस ढिगाऱ्याखाली
किन्नौर: हायवेवर कोसळली दरड; प्रवाश्यांसह बस ढिगाऱ्याखालीSaam Tv

किन्नौर: हायवेवर कोसळली दरड; प्रवाश्यांसह बस ढिगाऱ्याखाली

हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये बुधवारी झालेल्या भीषण भूस्खलनामध्ये एक बस आणि अनेक वाहने मलब्यात पडली आहेत. ज्यामध्ये एक बसचा अपघात झाल्याची माहिती आहे.
Published on

शिमला: हिमाचल प्रदेशच्या Himachal Pradesh किन्नौरमध्ये Kinnaur बुधवारी झालेल्या भीषण भूस्खलनामध्ये एक बस आणि अनेक वाहने मलब्यात पडली आहेत. ज्यामध्ये एक बसचा अपघात झाल्याची माहिती आहे, त्यामध्ये 40 ते 45 लोक प्रवासी बसले होते. सुरुवातीच्या माहितीनुसार, किन्नौरमधील रेकॉन्ग पीओ-शिमला महामार्गावर हा अपघात झाला.

किन्नौरचे एसपी साजुराम राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना भाभा नगर पोलीस स्टेशन परिसरातील महामार्गावर दरड कोसळल्याची माहिती मिळाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस, राज्य पोलीस आणि होमगार्ड जवानांना येथे पाठवण्यात आले आहे. याशिवाय मदतकार्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. घटनास्थळी पोहोचल्यानंतर अपघाताशी संबंधित अधिक माहिती देण्यात येईल, असे एसपी यांनी म्हटले आहे.

किन्नौर: हायवेवर कोसळली दरड; प्रवाश्यांसह बस ढिगाऱ्याखाली
IAS टॉपर्सचा मोडला संसार; न्यायालयाची घटस्फोटाला मान्यता

हिमाचलमधील या घटनेनंतर मुख्यमंत्री कार्यालयापासून दिल्लीपर्यंतचे अधिकारीही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अनेक वाहने ढिगाऱ्याखाली दबल्याचा स्थानिकांचा दावा आहे. याशिवाय, ज्यामध्ये बसच्या ढिगाऱ्याखाली दबल्याची बातमी समोर आली आहे, त्यात 40-45 प्रवासी अडकल्याचे सांगण्यात आले आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com