Bank FD SaamTv
देश विदेश

बँकेत FD करण्यापूर्वी 'या' गोष्टींचा विचार करा, अधिक फायदा होईल

गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही ही बातमी जरूर वाचा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही ही बातमी जरूर वाचा, कारण देशात सर्वात मोठी खासगी बँक (Private bank) एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) ग्राहकांना मोठी बातमी दिली आहे. एचडीएफसी बँकेने बुधवारी २ कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीच्या (FD) व्याजदरात (Interest rate) वाढ केली आहे. नवीन दर १८ मे २०२२ पासून लागू झाले आहेत. वेगवेगळ्या कालावधीसाठी व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. HDFC बँक ७ ते २९ दिवसांत मुदत ठेवींवर २.५० टक्के व्याज देणे सुरू ठेवणार आहे.

३० ते ९० दिवसांत मुदत ठेवींवर व्याजदर ३ टक्क्यांवर स्थिर राहणार आहे. सामान्य लोकांना ९१ दिवस ते ६ महिन्यांत परिपक्व होणाऱ्या FD वर ३.५० टक्के व्याजदर मिळत राहणार आहे. त्यावेळी, बँक ६ महिने १ दिवस ते ९ महिन्यांत मुदत ठेवीवर ४.४० टक्के व्याज दिला जाणार आहे. HDFC बँक ९ महिने, १ दिवस (Day) आणि १ वर्षापेक्षा कमी मुदतीच्या FD वर ४.४० टक्के व्याज देत आहे. परंतु, आता या कालावधीसाठी व्याजदर ४.५० टक्के झाले आहेत. त्यात १० बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे.

हे देखील पाहा-

HDFC बँक १ ते २ वर्षात मुदतपूर्ती होणाऱ्या ठेवींवर ५.१० टक्के व्याजदर देत राहणार आहे. पहिल्या २ वर्षांच्या १ दिवसात - ३ वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर व्याज दर ५.२० टक्के होता, परंतु, तो २० आधार अंकांनी वाढवून ५.४० टक्के करण्यात आला आहे. ३ वर्ष १ दिवस ते ५ वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर, बँक आता ५.६० टक्के व्याज दिला जाणार आहे, जे पूर्वी ५.४५ टक्के होते. त्यामध्ये १५ आधार अंकांची वाढ झाली आहे. अगोदर ५ वर्षे, १ दिवस आणि १० वर्षे मुदतीच्या ठेवींवर व्याजदर ५.६० टक्के होता.

परंतु, आता तो १५ आधार अंकांनी वाढवून ५.७५ टक्के करण्यात आला आहे. HDFC बँक ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याज देत राहणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना ७ दिवस ते ५ वर्षे मुदतीच्या ठेवींवर ०.५० टक्के अतिरिक्त व्याज मिळणार आहे, तर बँकेच्या विशेष FD योजनेत ज्येष्ठ नागरिक सेवा FD मध्ये, त्यांना १ दिवस ते १० वर्षांपर्यंतच्या ५ वर्षांच्या FD वर ०.५० टक्के अतिरिक्त व्याज मिळणार आहे. यामुळे ०.१५ टक्के अधिक व्याज मिळणार आहे.

सीनियर सिटीझन केअर एफडीमध्ये ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. पूर्वी ज्येष्ठ नागरिक सेवा एफडीचा व्याजदर ६.३५ टक्के होता. मात्र, आता ज्येष्ठ नागरिकांसाठी ६.५० टक्के झाला आहे.

HDFC बँक व्याज दर २०२२-

७- १४ दिवस - २.५०%

१५- २९ दिवस - २.५०%

३०- ४५ दिवस- ३.००%

४६- ६० दिवस- ३.००%

६१- ९० दिवस - ३.००%

९१ दिवस- ६ महिने - ३.५०%

६ महिने १ दिवस- ९ महिने - ४.४०%

९ महिने १ दिवस १ वर्ष- ४.५०%

१ वर्ष- ५.१०%

१ वर्ष १ दिवस- २ वर्षे- ५.१०%

२ वर्षे १ दिवस- ३ वर्षे- ५.४०%

३ वर्षे १ दिवस- ५ वर्षे- ५.६०%

५ वर्षे १ दिवस - १० वर्षे- ५.७५%

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain : राज्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने झोडपलं; नांदेड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

Heart Attack: सकाळची ही सवय वाढवते हार्ट अटॅकचा धोका; रक्तवाहिन्या का होतात ब्लॉक?

Rajeev Deshmukh : ऐन दिवाळीत राजकीय वर्तुळात शोककळा; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिलेदाराचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

KDMC : दिवाळीच्या दिवशी कंत्राटी कामगारांचं ठिय्या आंदोलन; बोनस न मिळाल्याने संताप व्यक्त

Winter Saree Look: हिवाळ्यात खास विंटर लुक हवा असेल तर या ट्रेंडी आणि सीझन परफेक्ट साडी नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT