प्रयागराजमध्ये भयावह चित्र, गंगेच्या काठावर पुन्हा दिसला मृतदेहांचा ढीग

नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात मृतदेह
Ganga River
Ganga RiverSaam Tv
Published On

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराजमध्ये गंगा नदीच्या (Ganga River) काठावर मोठ्या प्रमाणात मृतदेह पुरले जात आहेत. फाफमाळ घाटामुळे पुन्हा एकदा कोरोनाच्या (Corona) काळातील आठवणी ताज्या केल्या जात आहेत. येथे मृतदेह दफन करण्याची प्रदीर्घ परंपरा आहे. मात्र, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (NGT) आणि जिल्हा प्रशासनाने (District Administration) गंगा घाटांवर मृतदेह पुरण्यास बंदी घालण्यात आली आहे. तरीही येथे मृतदेहांचे दफन करणे हा चिंतेचा विषय झाला आहे.

हे देखील पाहा -

फामफाळ घाटात रोज डझनभर मृतदेह वाळूमध्ये पुरले जात आहेत. यामुळे येथे फक्त मृतदेहाचे थडगे दिसून येतात. खरे तर, सध्या पाऊस (rain) पडत आहे. पावसाळा सुरू झाल्यामुळे आणि गंगेच्या पाण्याची पातळी वाढल्याने नदीकाठी गाडलेले मृतदेह गंगेत जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे नदीही मोठ्या प्रमाणात प्रदूषित होण्याची शक्यता आहे. मात्र, जिल्हा प्रशासन व महापालिका याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे.

Ganga River
राजीव गांधी हत्येप्रकरणी मोठा निर्णय, सर्वोच्च न्यायालयाकडून दोषी ए. जी. पेरारिवलन याला सोडण्याचे आदेश

गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात गंगेच्या काठावर मोठ्या प्रमाणात मृतदेह पुरण्यात आले होते. प्रसारमाध्यमांनी हा मुद्दा उपस्थित केल्यावर त्याची जगभरामध्ये चर्चा झाली. यानंतर प्रयागराज नगरपालिकेने वाळूत पुरलेले शेकडो मृतदेह बाहेर काढून पेटवून देण्यात आले होते. यानंतर प्रशासनाने नदीकाठावर मृतदेह पुरण्यास बंदी घातली होती. मात्र, बंदी असतानाही लोकांनी पुन्हा गंगा नदीच्या काठावर मृतदेह पुरण्यास सुरुवात केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com