Newly sworn-in Prime Minister Tarique Rahman addresses the nation after rejecting constitutional amendments proposed by the interim government of Muhammad Yunus. saam tv
देश विदेश

Bangladesh Politics: संविधान बदलण्यास नव्या PM चा नकार; तारिक रहमान यांनी युनूस यांचा प्रस्ताव फेटाळला

Bangladesh Political Shift: बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांनी मुहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने मांडलेला प्रस्ताव फेटाळून लावलाय. त्यांनी संविधानात सुधारणा करण्यास नकार दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

  • तारिक रहमान यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली

  • संविधानात दुरुस्ती न करण्याचा स्पष्ट निर्णय

  • मुहम्मद युनूस यांच्या प्रस्तावाला नकार

बीएनपी नेते तारिक रहमान यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. तारिक रहमान यांच्यासह २५ खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. नवी सरकारच्या मंत्रिमंडळात दोन हिंदू नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान पदाची शपथ घेण्याआधीच त्यांनी एक मोठा निर्णय घेत मोहम्मद युनूस यांना दणका दिलाय. तारिक यांनी संविधानात सुधारणा करण्यात येणार नसल्याचं म्हटलंय. मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने कॉन्स्टिट्यूशन रिफॉर्म काउंसिलचा प्रस्ताव दिला होता.

खासदारांच्या शपथविधीच्यावेळीच मोहम्मद युनूस यांच्या या मनमानी निर्णयाला बीएनपीने फेटाळून लावलंय. BNP नेता सलाउद्दीन अहमद यांनी तारिक रहमान यांनी सांगितलं की, तारिक रहमान यांच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांना कॉन्स्टिट्यूशन रिफॉर्म काउंसिल फॉर्मवर स्वाक्षरी करून नये, असं सांगण्यात आलं. कारण ते परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले नव्हते. बीएनपीच्या या निर्णयामुळे मोहम्मद युनूस यांच्या संविधानात सुधारणा करण्याच्या प्रयत्नांना तडा गेलाय. या परिषदेचा उद्देश संसदीय निवडणुकांसोबत झालेल्या जनमत चाचणीनुसार बांगलादेशच्या संविधानात बदल करणे हा होता.

कॉन्स्टिट्यूशन रिफॉर्म काउंसिल संविधानात नाही

डेली स्टारमधील वृत्तानुसार सलाहुद्दीन अहमद यांनी स्पष्ट केले की, कॉन्स्टिट्यूशन रिफॉर्म काउंसिलचा कमल संविधानात नाहीये. त्यांनी सांगितले की, जनमत चाचणीच्या निकालांच्या आधारे प्रथम परिषदेचा संविधानात समावेश केला पाहिजे. शिवाय, त्यांनी सांगितले की त्यासाठी अनेक महत्त्वाचे नियम आवश्यक आहेत. यात संविधान सुधारणा परिषदेच्या सदस्यांना पदाची शपथ कोण देईल हे देखील समाविष्ट आहे. तसेच काउंसिलला आधी जनमत घेऊन संविधानात समाविष्ट केले पाहिजे.

दरम्यान बीएनपी खासदारांना केवळ बांगलादेश संसदेचे सदस्य म्हणून शपथ देण्यात आली. बीएनपीचा असा दावा आहे की, संविधान सुधारणा परिषदेचे नियम अद्याप सध्याच्या संविधानाचा भाग नाहीत आणि त्यावर संसदेत चर्चा आवश्यक आहे. सकाळी १०:२८ वाजता तारिक रहमान त्यांच्या पत्नी झुबैदा रहमान आणि मुलगी झैमा रहमान यांच्यासह खासदार म्हणून शपथ घेण्यासाठी शपथगृहात दाखल झाले. यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त एएमएम नासिर उद्दीन यांनी १३ व्या संसदीय निवडणुकीत निवडून आलेल्या खासदारांना शपथ दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रिकाम्या पाण्याच्या बाटलीत अडकलेल्या सापाची सुटका करून सर्पमित्राने दिले जीवदान

Shocking : मुलाच्या डोक्यात सैतान शिरला, जन्मदात्या बापाचा जीव घेतला; हैवानी कृत्यामागचं कारण उघड

लाडक्या बहीणींची धाकधूक वाढली, 1500 रुपये कायमचे बंद होणार; कारण काय?

ऐतिहासिक निर्णय, नॉनव्हेज खाण्यावर बंदी; हॉटेल-दुकानातही चिकन, मटण मिळणार नाही, कोणत्या शहरात मनाई?

कोल्हापुरात तरुणानं केली हॉटेलची तोडफोड; पोलिसांनी चोपलं, धक्कादायक कारण, VIDEO

SCROLL FOR NEXT