Plane Crash x
देश विदेश

Plane Accident : अहमदाबादसारखी घटना, टेकऑफनंतर विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू

Bangladesh Plane Accident : बांगलादेशच्या ढाका शहरातील एका शाळेवर हवाई दलातील विमान कोसळले. या विमान दुर्घटनेमध्ये किमान १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर ५० हून अधिक अपघातग्रस्त लोकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Yash Shirke

Bangladesh Plane Crash : बांगलादेशची राजधानी ढाका येथे सोमवारी (२१ जुलै) दुपारी मोठी दुर्घटना घडली. बांगलादेश हवाई दलाचे प्रशिक्षण विमान ढाकामधील एका महाविद्यालयाच्या आवारात कोसळले. या विमान दुर्घटनेमध्ये किमान १९ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात ५० हून अधिकजण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बांगलादेश हवाई दलाचे एफ-७ बीजीआय प्रशिक्षण विमान हे ढाकाच्या उत्तरेकडील उत्तरा भागात कोसळले. विमानाने दुपारी २.०६ वाजता विमानतळावरुन उड्डाण केले होते. हे विमान उत्तरा भागातील माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजच्या आवारात कोसळले, अशी माहिती बांगलादेश लष्कराच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.

एफ-७ बीजीआयचे प्रशिक्षण विमान माइलस्टोन स्कूल अँड कॉलेज परिसरात कोसळल्यानंतर मोठी आग भडकली. आकाशात धुराचे लोट पसरल्याचे पाहायला मिळाले. आग वाढू नये यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी विमानाच्या तुटलेल्या अवशेषांवर पाणी फवारण्यास सुरुवात केली. अपघातामुळे इमारतीच्या भिंतीमध्ये मोठं छिद्र पडल्याचे पाहायला मिळाले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरु आहे. या विमान दुर्घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद यूनुस यांनी ढाका विमान दुर्घटनेवर प्रतिक्रिया दिली. 'अपघाताचे कारण तपासण्यासाठी आणि सर्व प्रकारची मदत सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत. या अपघातात हवाई दलाचे जवान, विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शाळेतील कर्मचाऱ्यांचा जीव गेला आहे. हे नुकसान भरुन न येणारे आहे, असे वक्तव्य मोहम्मद यूनुस यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bomb Blast: 11 आरोपी निर्दोष,मग बॉम्बस्फोट कुणी केले?

Political Clash: छावा विरुद्ध राष्ट्रवादी, महाराष्ट्रात वाद पेटला

Pune Crime : मुलाने प्रॉपर्टीसाठी छळ करायची सीमा गाठली; आईला वृद्धाश्रमात धाडलं, बहिणीला मनोरुग्णालयात, पुण्यातील प्रकार

Manikrao Kokate: रमी खेळणं कृषीमंत्र्यांना भोवणार? वाचाळवीर कोकाटेंचं मंत्रिपद जाणार?

Jagdeep Dhankhad Resign : मोठी बातमी! जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा, कारणही समोर

SCROLL FOR NEXT