Pune Crime : पुण्यात पुन्हा हाणामारी! बस डेपोमध्ये एसटी चालक आणि कंडक्टरला बेदम मारहाण, घटनेचा Video Viral

Pune News : पुण्याच्या शिरूर एसटी बस डेपोमध्ये पुणे - माजलगाव प्रवास करणाऱ्या बसमधील कंडक्टर आणि ड्रायव्हरला मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam Tv
Published On

रोहिदास गाडगे, साम टीव्ही प्रतिनिधी

Pune : पुण्यातील शिरूर एसटी बस डेपोमध्ये बसचालक आणि कंडक्टरवर मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एसटी डेपोमध्ये मारहाण झाल्याप्रकरणी संताप व्यक्त केला जात आहे.

Pune Crime News
Pune Accident : पुण्यात हिट अँड रनचा थरार! भरधाव कारची दुचाकीला धडक; मुलाचा मृत्यू, आईची प्रकृती गंभीर

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ते माजलगाव यादरम्यान प्रवास करणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसमधील कंडक्टर आणि बसचालक यांना शिरूर एसटी डेपो येथे तीन जणांनी लाकडाच्या दांड्याने मारहाण केली. एसटी कंडक्टर आणि बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका प्रवाशामध्ये वाद झाला. त्यानंतर ही मारहाणीची घटना घडली.

कंडक्टरच्या तक्रारीनुसार, प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसमध्ये एक प्रवासी हा मोठ्या प्रमाणात छत्र्यांचा साठा घेऊन चढण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी बस कंडक्टरने त्याला 'बसमध्ये जागा नाही. तुम्ही दुसऱ्या बसने प्रवास करा', असे सांगितले. त्यावर संतापून प्रवाशाने 'एसटी तुझ्या बापाची आहे का?' असे म्हणत कंडक्टरला मारहाण केली.

Pune Crime News
IND vs ENG : टीम इंडियाला धक्क्यांवर धक्के, स्टार खेळाडू मालिकेतून बाहेर; भारताचे चार खेळाडू जखमी

मारहाण करणाऱ्या प्रवाशाने फोन करुन आणखी दोन जणांना बोलावले आणि त्यांनी मिळून कंडक्टर आणि बसचालक असे दोघांना मारहाण केली. या हाणामारीत कंडक्टरच्या खिशातील अंदाजे २१ हजार रुपये गहाळ झाल्याचे कंडक्टरने तक्रारीत म्हटले आहे. मारहाण करणाऱ्या तिघांच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Pune Crime News
Mira Road : घरी बोलावलं अन् डाव साधला, पायलटकडून २३ वर्षीय एअर हॉस्टेसवर बलात्कार; मीरा रोड हादरलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com