India Bangladesh Friendship Saam Tv
देश विदेश

India Bangladesh Friendship: बांगलादेश धर्म नाही, मित्रत्व जपणार; पाकविरोधात बांग्लादेश भारताच्या बाजूने

India Bangladesh Friendship: भारताविरोधातील लढाई पाकिस्तान धर्मावर नेलीय. मात्र भारताच्या शेजाऱ्याने मित्रत्व जपण्याचा निर्णय घेतलाय. बांग्लादेशची भारत पाकिस्तान संदर्भात नेमकी काय भूमिका आहे? वाचा या स्पेशल रिपोर्टमधून

Bharat Mohalkar

India Bangladesh Friendship: पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये बंदुकीच्या जीवावर नंगानाच केलाय.. त्यामुळे बदल्याच्या भावनेनं भारतानं पाकिस्तानची कोंडी केलीय.. तर भारताकडून कारवाईच्या भीतीने पाकिस्तानने थेट मुस्लीम राष्ट्र समुहाकडे धाव घेतली... मात्र भारताचा शेजारी बांग्लादेशने धर्म न जपता मित्रत्व जपत पाकिस्तानविरोधात भारताला पाठींबा असल्याचं जाहीर केलंय...बांग्लादेशचे हंगामी पंतप्रधान मोहम्मद युनूस यांनी नेमकं काय म्हटलंय? पाहूयात...

1971

पाकपासून बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवण्यात भारताची महत्वाची भूमिका

मुक्तीसंग्रामावेळी भारताकडून बांग्लादेशी शरणार्थींना आश्रय

1972

भारत-बांगलादेशमध्ये मैत्री, शांतता आणि सहकार्य करार

सीमा सुरक्षा, कुंपन यासारख्या गोष्टींसाठी सहकार्याची भावना

भारत बांगलादेशचा सर्वात मोठा व्यापारी भागिदार

971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झालं.. त्यावेळी भारताला पुर्व पाकिस्तान म्हणजेच आताच्या बांग्लादेशमधील बंडखोरांनी भारताला पाठींबा दिला... तेव्हा पाकिस्तानचा तुकडा पाडून बांग्लादेश स्वतंत्र करण्यासाठी भारताने महत्वाची भूमिका बजावली.. तेव्हापासून भारत-बांग्लादेशमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत... मात्र मध्यंतरीच्या काळात शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर बांग्लादेश आणि भारतामधील संबंध बिघडण्याची शक्यता होती.. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर बांग्लादेशने धर्माकडे न झुकता मित्रत्व जपण्याचा निर्णय घेतलाय.

खरंतर दक्षिण आशियाई देशांमधील चीन आणि पाकिस्तान बांग्लादेशला भारताविरोधात चिथावणी देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र बांग्लादेशने भारताच्या बाजूने भूमिका घेतल्याने पाकड्यांचे नापाक इरादे भुईसपाट झालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दहावीच्या पेपर तपासणीचा मोठा घोटाळा; कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार? VIDEO

Maharashtra Live News Update: निलंगा बस डेपोत उभ्या असलेल्या बसने घेतला पेट

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या नावे रमाई आवास योजनेत घोटाळा; फडणवीसांच्या नावाचं बनवलं चक्क आधार आणि रेशनकार्ड

रत्नागिरीला भूकंपाचा हादरा; घाबरून लोक घराबाहेर पळाले

LPG Crisis : 'गॅस' भडका शमवण्यासाठी ओतणार 'रॉकेल'; टंचाईवर काढला तोडगा, सरकारनं घेतले २ महत्वाचे निर्णय

SCROLL FOR NEXT