Bangladesh First Female PM Khaleda Zia Passes Away Saam Tv
देश विदेश

PM Khaleda Zia : बांग्लादेशवर शोककळा! पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा झिया यांचे निधन

Bangladesh First Female PM Khaleda Zia Passes Away : बांग्लादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा झिया यांचे आज सकाळी 6 वाजता निधन झाले. 20 दिवस व्हेंटिलेटरवर उपचारानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेने बांगलादेशवर शोककळा पसरली आहे.

Alisha Khedekar

  • बांग्लादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा झिया यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन

  • त्या २० दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होत्या

  • छाती संसर्ग, मधुमेह व अन्य आजारांमुळे प्रकृती गंभीर होती

  • त्यांनी नुकतेच बोगुरा-7 साठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता

  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली

बांग्लादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) च्या प्रमुख खालिदा झिया यांचे आज सकाळी ६ वाजता वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. त्या २० दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होत्या. खालिदा गेल्या अनेक वर्षांपासून छाती संसर्ग, यकृत, मूत्रपिंड, मधुमेह, संधिवात आणि डोळ्यांच्या समस्यांनी ग्रस्त होत्या. त्यांच्या कुटुंबियांनी आणि पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे.

खालिदा यांनी १९९१ ते १९९६ आणि २००१ ते २००६ असे दोनदा बांग्लादेशचे पंतप्रधान म्हणून काम पाहिले. त्या माजी राष्ट्रपती झियाउर रहमान यांच्या पत्नी होत्या. खालिदा झिया यांनी सोमवारी (२९ डिसेंबर) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बोगुरा-७ मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते दुपारी ३ वाजताच्या सुमारास उपायुक्त आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचले. त्यावेळी, खालिदा झिया यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट झाले होते.

त्या व्हेंटिलेटरवर होत्या. तरीही, बीएनपीने खालिदा निवडणूक लढवतील असा निर्णय घेतला. बोगुरा-७ ही जागा बीएनपीसाठी विशेष महत्त्वाची आहे. या भागात पक्षाचे संस्थापक आणि खालेदा झिया यांचे पती झियाउर रहमान यांचे घर आहे. खालेदा यांनी १९९१, १९९६ आणि २००१ मध्ये तीन वेळा या जागेवरून निवडणूक जिंकली.

खालिदा झिया यांचा जन्म १९४५ मध्ये जलपाईगुडी येथे झाला. त्यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण दिनाजपूर मिशनरी स्कूलमध्ये केले आणि १९६० मध्ये दिनाजपूर कन्या शाळेतून मॅट्रिक उत्तीर्ण केले. खालिदा झिया यांच्या पश्चात त्यांचा मोठा मुलगा तारिक रहमान, दोन सुना आणि तीन नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा धाकटा मुलगा अराफत रहमान कोको याचे २०१५ मध्ये मलेशियात निधन झाले.

खालिदा यांचा मोठा मुलगा बीएनपीचे कार्यवाहक अध्यक्ष तारिक रहमान २००८ पासून लंडनमध्ये राहत होते. ते २५ डिसेंबर रोजी बांग्लादेशला परतले. त्यांचे वडील इस्कंदर मजुमदार व्यापारी होते आणि त्यांची आई तय्यबा मजुमदार गृहिणी होत्या. खालिदा झिया या कुटुंबातील धाकट्या होत्या आणि घरी त्यांना प्रेमाने "पुतुल" म्हणून ओळखले जात असे. दरम्यान खालिदा यांच्या जाण्याने शोककळा पसरली असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत खालिदा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chaibasa News : ३६ तासांपासून धुमश्चक्री, जवान तुटून पडले, आतापर्यंत २१ नक्षलवाद्यांचा खात्मा

Kalyan : ६० हजारांचा मोह, तो बुकिंग क्लर्क अन् अलगद जाळ्यात अडकला रेल्वेचा तोतया व्हिजिलन्स इन्स्पेक्टर

Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेवर वाद, दूरच्या केंद्रांमुळे उमेदवारांचे आंदोलन

Amazon Layoffs: मोठी बातमी! अ‍ॅमेझॉनमध्ये सर्वात मोठी नोकरकपात, १४,००० कर्मचाऱ्यांना नारळ देणार

IND vs PAK: पाकिस्तानी खेळाडूशी हँडशेक, मिठीही मारली...; सामन्यानंतर इरफान पठाण सोशल मीडियावर ट्रोल

SCROLL FOR NEXT