Bangladesh Crisis Saam Digital
देश विदेश

Bangladesh Crisis : बांगलादेशमधील हिंसाचारामागे पाकिस्तानचा हात, 'छात्रशिविर'चा केला जातोय वापर?

ISI Behind Bangladesh Unrest : बांगलादेशमधील हिंसाचारामागे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असल्याची माहिती गुप्तचर विभागाच्या अहवालातून समोर आलं आहे.

Sandeep Gawade

बांगलादेशातील सरकार उलथवून टाकणे आणि हिंसाचारामागे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय हात आहे. गुप्तचर विभागाच्या अहवालात हा मोठा खुलासा करण्यात आला आहे. पाकिस्तानने हिंसाचार भडकावण्यासाठी छात्रशिविर नावाच्या संघटनेचा वापर केला आहे. ही संघटना बांगलादेशातील प्रतिबंधित जमात-ए-इस्लामीचा एक भाग आहे. त्याचबरोबर जमात-ए-इस्लामीला पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा पाठिंबा आहे. शेख हसीना यांनी जमात-ए-इस्लामी, स्टुडंट युनियन आणि इतर संघटनांवर बंदी घातल्याचेही वृत्त अलीकडेच आले होते. याच्या निषेधार्थ या संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या.

बांगलादेशी अधिकाऱ्यांकडे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) च्या कार्यवाहक प्रमुख खालिदा झिया यांचा मुलगा तारिक रहमान याच्या संगनमताचे पुरावेही आहेत. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या सहकार्याने लंडनमध्ये बांगलादेशातील आंदोलनाची रूपरेषा तयार करण्यात आल्याची माहिती आहे. ब्ल्यू प्रिंट तयार केल्यानंतर बांगलादेशात हिंसाचार घडवून आणण्यात आल्याचं अहवालात म्हटलं आहे.

बांगलादेशी अधिकाऱ्यांनी, तारिक रहमान आणि आयएसआयच्या अधिकाऱ्यांमध्ये सौदी अरेबियामध्ये झालेल्या बैठकीचे पुरावे असल्याचा दावा केला आहे. सोशल मीडिया हँडल X वर शेख हसीना सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी 500 हून अधिक पोस्ट देखील करण्यात आल्या. यामध्ये पाकिस्तानी हँडल्सचाही समावेश आहे. जमात-ए-इस्लामीच्या विद्यार्थी संघटनेला पाकिस्तानच्या आयएसआयकडूनही पाठिंबा मिळत असल्याची माहिती मिळाली होती. बांगलादेशात हिंसाचार भडकवणे आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय रूप देणं हा या संघटनेचा उद्देश होता.

दरम्यान बांगलादेशमधील हिंसाचारावरून अमेरिकेकडेही बोट दाखवण्यात येत आहे. कारण जानेवारीत झालेल्या निवडणुका अमेरिकेने नाकारल्या होत्या. 14 जुलै रोजी US दूतावासाने दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवली होती. नंतर ही बातमी वेबसाइटवरून काढून टाकण्यात आली. त्यामुळे या बातमीनंतर आंदोलन अधिक हिंसक झाले. त्याचवेळी बांगलादेशातील अमेरिकेचे राजदूत पीटर डी हास यांनी जमातच्या नेत्यांसोबत गुप्त बैठक घेतली होती. अमेरिकेच्या या सर्व घडामोडींना या हिंसाचाराशी जोडलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

SCROLL FOR NEXT