Bangladesh Crime News Saam Tv
देश विदेश

Crime: मध्यरात्री गॅरेजमध्ये घुसले, पेट्रोल टाकून तरुणाला जिवंत पेटवलं; मृत्यू होईपर्यंत तिथेच थांबले

Bangladesh Crime News: बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची निर्घृण हत्या करण्यात आली. २३ वर्षीय तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आले. या तरुणांचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मदतीला कुणीच आले नाही.

Priya More

Summary -

  • बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या करण्यात आली

  • एका 23 वर्षीय तरुणाला गॅरेजमध्ये जिवंत जाळण्यात आले

  • मध्यरात्री हल्लेखोरांनी शटर उघडून पेट्रोल टाकून तरुणाला पेटवून दिले

  • निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात तणाव वाढण्याची शक्यता

बांगलादेशमध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीत हिंदूंवर हल्ले सुरूच आहेत. हिंदूना लक्ष्य करत त्यांची हत्या केली जात आहे. शुक्रवारी रात्री २३ वर्षीय चंचल भौमिक या तरुणाला जिवंत जाळण्यात आले. नरसिंगडी येथील गॅरेजमध्ये चंचल झोपला होता. त्याचवेळी त्याठिकाणी आलेल्या काहींनी त्याची हत्या केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चंचल आपल्या गॅरेजमध्ये झोपला होता. त्यावेळी हल्लेखोरांनी बाहेरून शटर उखडून टाकले. त्यानंतर त्यांनी चंचलवर पेट्रोल टाकले आणि पेटवून दिले. चंचल जोरजोरात ओरड राहिला पण त्याला कुणीच वाचवायला आले नाही. चंचलचा मृत्यू होईपर्यंत हल्लेखोर तिथेच उपस्थित होते. चंचल कुटुंबातील एकच कमावता व्यक्ती होता. त्याच्या पाश्तात त्याची आजारी आई आणि अपंग भाऊ आहे.

शेजाऱ्यांच्या मते, तो एक शांत आणि मेहनती मुलगा होता. कुटुंबाचा आरोप आहे की हा साधा गुन्हा नव्हतातर धार्मिक द्वेषातून प्रेरित होऊन केलेला पूर्वनियोजित हत्या आहे. याआधी बांगलादेशमध्ये अनेक हिंदूची हत्या करण्यात आली. दीपू चंद्र दास आणि खोकॉन चंद्र दास या हिंदू तरुणांवर अशाच प्रकारचे हल्ले करत त्यांना जिवंत जाळण्यात आले होते.

जमात-ए-इस्लामी या कट्टरपंथी संघटनेचे नेते उघडपणे या हिंसाचाराला खतपाणी घालत आहेत. बरगुना-२ मतदारसंघातील उमेदवार अफझल हुसेन यांनी अलिकडच्या विधानांनी आगीत तेल ओतले आहे. एका निवडणूक रॅलीत त्यांनी असा युक्तिवाद केला की, ८० टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशात संसदेत गैर-मुस्लिमांना स्थान नसावे. शिवाय हुसेन यांनी संविधान नाकारले आहे आणि मध्ययुगीन दंड कायदे (जसे की अंगच्छेदन) लागू करण्याचा सल्ला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: मालाड रेल्वे स्थानकावर प्रोफेसरची हत्या, नेमकं लोकलमध्ये काय घडलं? घटनेचा थरारक VIDEO समोर

Maharashtra Live News Update: औरंगजेबाच्या क्रूरतेला गुरु गोविंदसिंग घाबरले नाही- देवेंद्र फडणवीस

चादर आणि सतरंजी आणून द्या; शिंदेंच्या शिवसैनिकांनी माजी आमदाराला घेरलं, नेमकं काय घडलं?

Chocolate Pudding: मुलांसाठी बनवा घरच्याघरी चॉकलेट ब्रेड कॅरॅमल पुडिंग, वाचा सोपी अन् झटपट रेसिपी

Hrithik Roshan: चेहरा पडलेला,हातात वॉकिंग स्टिक; हृतिक रोशनला झाली गंभीर दुखापत, व्हिडिओपाहून चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT